शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

१५ वर्ष पाठीत गोळी अडकलेली पण महिलेला कोणत्याच वेदना होत नव्हत्या, साधी जाणीवही नव्हती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 19:32 IST

दीड दशकानंतर ही गोळी तिच्या शरीरातून काढली, मग तिला आठवलं की ही गोळी तिच्या शरीराच्या आत (Bullet Stuck in Body for 15 Years) कशी पोहोचली.

जगात कधी-कधी अशा काही घटना घडतात, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. अशीच एक घटना अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेसोबत घडली आहे. १५ वर्षांपासून महिलेच्या पाठीत एक बंदुकीची गोळी अडकली होती (Woman Living with Bullet in Body) आणि ती आपलं सामान्य जीवन जगत होती. तिला या गोष्टीची कल्पनाही नव्हती. दीड दशकानंतर ही गोळी तिच्या शरीरातून काढली, मग तिला आठवलं की ही गोळी तिच्या शरीराच्या आत (Bullet Stuck in Body for 15 Years) कशी पोहोचली.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ही घटना एरिका माइल्स नावाच्या नर्सिंग असिस्टंटसोबत घडली. ही घटना तिने स्टक ऑन क्वेस्ट रेड या अमेरिकन सीरिजमध्ये शेअर केली. एरिका माईल्स किशोरवयीन असताना ही गोळी तिच्या पाठीत अडकली आणि ती अनेक वर्षे तिथेच अडकून राहिली. एरिकाला याची कल्पनाही नव्हती.

आपल्यासोबत घडलेली ही घटना आठवताना एरिकाने सांगितलं की, २००५ मध्ये फुटबॉल सामन्यानंतर ती आपल्या कारची वाट पाहत होती. दरम्यान, दोन गटात हाणामारी होऊन त्यांनी आपापसात गोळीबार सुरू केला. गोळीबारादरम्यान एरिकासह काही निष्पाप लोक इथे अडकले होते. त्याचवेळी एरिकाच्या पाठीत गोळी लागली आणि ती तिच्या हाडांमध्ये शिरली. त्यावेळी तिला फार काही जाणवलं नाही आणि मागील १५ वर्षांत तिला काही त्रासही झाला नाही. मात्र हळूहळू ही गोळी तिच्या कमरेच्या बाजूला सरकायला लागल्याने तिला त्रास होऊ लागला.

एरिकाची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर जॉर्ज क्रॉफर्ड म्हणाले की, शरीरातून ताबडतोब गोळी बाहेर काढणं अवघड काम आहे. अशा परिस्थितीत अनेकवेळा गोळी कोणत्याही रक्तवाहिनीत किंवा सांध्यात अडकली नसेल तर ती शरीरातून काढलीच जात नाही. जर ती ताबडतोब काढली तर ती रुग्णाला हानी पोहोचवू शकते. एरिकाच्या बाबतीतही तेच होतं. तिच्या शरीरात गोळी आहे हेही ती विसरली होती. मात्र नंतर अचानक या गोळीने आपली जागा बदलण्यास सुरुवात केली. तेव्हा डॉक्टर जॉर्ज यांनी ती शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकली. आता एरिका बरी झाली आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके