शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकच्या गळ्यात 77 वर्षांपासून अडकली बंदुकीची गोळी; X-ray पाहून डॉक्टरही चकीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 14:54 IST

गोळी गळ्यात अडकल्याची माहिती या 95 वर्षीय माजी सैनिकालाही नव्हती.

युद्धामध्ये सैनिकांना गोळ्या लागतात, या गोळ्या काढूनही अनेकदा त्यांचा मृत्यू होतो. पण, एक व्यक्ती आयुष्यभर एक गोळी शरीरात घेऊन फिरतो. 95 वर्षीय व्यक्ती उपचारासाठी रुग्णालयात गेला, यावेळी डॉक्टरांनी एक्स-रे काढताच त्यांना धक्का बसला. त्‍याच्‍या घशात गोळी अडकल्‍याचे एक्सरेमधून समोर आले. 

77 वर्षांपासून गोळी शरीरात95 वर्षीय झाओ हे चीनचे रहिवासी असून, निवृत्त लष्करी जवान आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या 77 वर्षांपासून ही गोळी त्यांच्या गळ्यात अडकली आहे. पण हे त्यांना कधीच कळले नाही. अलीकडेच झाओ शानडोंग प्रांतातील रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या गळ्याचे एक्स-रे काढला. यावेळी पहिल्यांदाच त्यांना गळ्यात गोळी अडकल्याचे आढळून आले. ही गोळी त्यांना दुसऱ्या महायुद्धात लागली होती. 

आजही शरीरावर युद्धाच्या कुणाझाओचा जावई वांग यांनी सांगितले की, ही गोळी त्यांच्या मानेवर कधी झाडली गेली, हे त्यांना माहित नाही. मात्र, युद्धादरम्यान त्यांना अनेकवेळा गोळ्या लागल्या आहेत. झाओच्या शरीरावर आजही अनेक युद्धाच्या खुणा दिसतात. एकदा युद्धादरम्यान, झाओ स्वतः जखमी कॉम्रेडला नदीच्या पलीकडे घेऊन जात असताना जखमी झाले होते. त्यांच्या शरीरावर आजही गोळ्यांच्या खुणा दिसून येतात. 

गोळी काढली जाणार नाहीयाप्रकरणी डॉक्टर म्हणतात की, 77 वर्षांपासून गोळी अडकली असूनही, झाओ यांना काही जाणवलं नाही, हे आश्चर्याची बाब आहे. दरम्यान, ही गोळी काढली जाणार नाही. यामागे झाओचे वय हे कारण सांगण्यात येत आहे. घशाचे ऑपरेशन करून गोळी काढताना त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. याबाबत झाओ म्हणतात- 'मी इतक्या वर्षांपासून निरोगी आहे, त्यामुळे आता मला काही फरकत पडत नाही.'

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयwarयुद्ध