शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

9 वर्षीय बहिणीचा जीव वाचवण्यासाठी भाऊ मगरीशी भिडला, जबड्यातून पाय बाहेर काढला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 17:06 IST

बहिणीला वाचवण्यासाठी मगरीशी भिडणाऱ्या भावाची जोरदार चर्चा होत आहे.

भाऊ बहिणीच्या प्रेमाला कोणत्याही पुराव्याची गरज नसते. बहिणीसाठी मोठा भाऊ वडिलांसारखा असतो, तो आई-वडिलांप्रमानेच लहान भावंडांवर प्रेम करतो, सांभाळ करतो आणि काळजी घेतो. पण कोवळ्या वयात, भावंडांच्या जिवासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालावा, अशा पद्धतीने जबाबदारी पार पाडल्याचे क्वचितच पाहायला मिळते. भाऊ-बहिणीच्या प्रेमाची अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात भावाने मगरीच्या तोंडातून बहिणी वाचवले आहे.

बहिणीचा जीव वाचवण्यासाठी एका भावाने भयंकर मगरीशी झुंज दिली आणि तिला वाचववले. मगरीने मुलीचा पाय पाय जबड्यात धरला होता, पण भावाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बहिणीचा पाय मगरीच्या तोंडातून बाहेर काढला. डेली स्टारच्या वृत्तानुसार, मगरीने जबड्यात पकडलेली मुलगी केवळ 9 वर्षांची होती. रेजिमिया हायकेरा असे तिचे नाव असून, ती बागेत झाडांना पाणी देत ​​असताना एक मगरी तिच्यावर हल्ला केला.

यानंतर मुलीने आरडाओरडा सुरू केला, बहिणीचा आवाज 19 वर्षीय भावाच्या कानावर पडताच तो धावत आला. बहिणीला अडचणीत असल्याचे पाहून 19 वर्षीय जोहान्सने आपल्या जीवाची पर्वा न करता भयंकर मगरीशी सामना केला. जोहान्स आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी आला तेव्हा तिचा पाय मगरीच्या तोंडात होता. यावेळी जोहान्सने दोन्ही हातांनी खेचून बहिणीचा पाय त्या भयानक प्राण्याच्या तोंडातून बाहेर काढला. 

या हल्ल्यातून रेजिमियाचा जीव वाचला, मात्र मगरीच्या हल्ल्यात तिच्या पायाला, कंबरेला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तिला दवाखान्यात न्यावे लागले. यावेळी जोहान्सही बहिणीला वाचवताना जखमी झाला. ही घटना समोर आल्यानंतर भाऊ जोहान्सच्या शौर्याने परिसरात कौतुक होत आहे. रेजिमिया हायकेराच्या घराजवळ एक नदी आहे जिथून अनेकदा प्राणी या परिसरात येतात, अशी माहिती आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय