शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

या ७२ वर्षीय कोट्याधीश व्यक्तीला हवीये तरुण बायको, अटींमुळे अजून सिंगल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 14:06 IST

ब्रिटनच्या एका कोट्यधीश व्यक्तीचा तरुण मुलगी पत्नी म्हणून मिळवण्याचा आणि तिच्यापासून प्रॉपर्टीला उत्तराधिकारी मिळण्याचा शोध सुरु आहे.

(photo credit: The Sun)

पैसा असला की माणसाला कसे चाळे सुचतात हे अनेकदा तुम्ही पाहिलं किंवा अनुभवलं असेल. पण आता आम्ही सांगत आहोत असा किस्सा कधी ऐकला आणि पाहिलाही नसेल. ब्रिटनच्या एका कोट्यधीश व्यक्तीचा तरुण मुलगी पत्नी म्हणून मिळवण्याचा आणि तिच्यापासून प्रॉपर्टीला उत्तराधिकारी मिळण्याचा शोध सुरु आहे. ७२ वर्षीय बेंजामिन स्लेडने एक वर्षांपासून सुरु केलेला हा पत्नीचा शोध सुरुच आहे.

बेंजामिनने एक वर्षांपूर्वी घोषणा केली होती की, त्याला पुन्हा एका चांगल्या पार्टनरसोबत सेटल व्हायचं आहे. पण त्याने हेही स्पष्ट केलं होतं की, त्याला कुणासोबतही नाही तर ड्रिम लेडीसोबत सेटल व्हायचं आहे. यासाठी त्यानी काही अटीही ठेवल्या आहेत. 

बेंजामिनला हव्या असणाऱ्या आदर्श महिलेची उंची ५ फूच ६ इंचापेक्षा कमी असून नये आणि तिचं वय ३० ते ४० दरम्यान असावं. त्यांच्या या घोषणेनंतर चांगलाच वाद झाला होता. बेंजामिन हे सोमरसेटमध्ये १३व्या शतकातील एका आलिशान घरात राहतात. 

सर बेंजामिन यांच्यानुसार, अनेक प्रयत्नांनंतरही त्यांना योग्य पार्टनर मिळाली नाहीये. कारण ज्या भेटल्या त्यातील काही जास्त वयाच्या होत्या तर काहींना मुलं नकोत. खरंतर त्यांच्या अटीही इतक्या विचित्र आहेत की, कदाचितच कुणी त्या पूर्ण करु शकेल. 

बेंजामिननुसार, त्यांच्या पार्टनरकडे शॉटगन लायसन्स असावं. तसेच तिच्याकडे हेलिकॉप्टर लायसन्स असावं जेणेकरु ती त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांवर फिरवू शकेल. बेंजामिननुसार, पत्नी एका डीलसारखी असते. जर तुम्हाला चीफ एक्झिक्यूटीव्ह असलेली पत्नी मिळाली तर हे डीलपेक्षा कमी नाहीये. एकाच किंमतीत तुम्हाला दोन गोष्टी मिळतात. 

स्लेडने मुलाखतीमध्ये सांगितले की, जर आपण चीफ एक्झिक्यूटीव्ह नोकरीवर ठेवला तर त्याला कमीत कमी ६० हजार पाऊंड पगार द्यावा लागतो. तो लवकर नोकरी सोडूनही जातो कारण त्यांना अॅम्बिशन असतं. कोणताही महिला जर त्यांच्या या मागण्या पूर्ण करेल तिला ते ५० हजार पाऊंड पगार आणि बोनसही देणार आहेत. 

आता बेंजामिन या पार्टनरच्या शोधात एक ट्विस्टही आणणार आहे. त्यांनी सांगितले की, आता त्यांना केवळ रोमान्स हवा आहे. आणि मुलींना वापरण्यासाठी क्रेडीट कार्ड मिळणार जेणेकरुन त्या शॉपिंग करु शकतील. त्यांनी जाहिरातीमध्ये लिहिले आहे की, मला माझ्या पार्टनरला Exotic ठिकाणांवर घेऊन जायचं आहे आणि चवदार पदार्थ खायचे आहेत.   

बेंजामिन यांच्या या शोधावर लोक हैराणही आहेत आणि त्यांना चिमटेही काढत आहेत. एका ट्विटर यूजरने लिहिले की, या माणसाला ३५ वर्षांची बायको विकत घ्यायची आहे, जिच्याकडे ड्रायव्हिंग, शूटिंग आणि हेलिकॉप्टर लायसन्स असावे. आणि हे सगळं कशासाठी केवळ एक उत्ताराधिकारी जन्माला घालण्यासाठी! 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल