शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

श्वानासाठी कपलला गहाण ठेवावं लागलं त्यांचं घर, पूर्ण घटना वाचून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 14:09 IST

एक दिवस त्यांची मुलगी रूबीला बागेत फिरवत होती. तेव्हाच जॅक रूजवेल क्रॉस ब्रीडच्या एका दुसऱ्या श्वानाने रूबीवर हल्ला केला.

पाळीव प्राण्यांवर लोक किती प्रेम करतात याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात. बरेच लोक तर श्वानांची आपल्या लेकरांसारखी काळजी घेतात. ते त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. एका व्यक्तीसोबतही असंच झालं. त्यांच्या श्वानासोबत असं काही घडलं की, त्यांना आपलं राहतं घरी गहाण ठेवावं लागलं. इतकंच नाही तर त्यांना घर विकावं सुद्धा लागू शकतं. 

मिररच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये राहणारी लन होल्डम आणि एलन बॅमफोर्डकडे एक श्वान आहे. ज्याचं नाव रूबी आहे. एक दिवस त्यांची मुलगी रूबीला बागेत फिरवत होती. तेव्हाच जॅक रूजवेल क्रॉस ब्रीडच्या एका दुसऱ्या श्वानाने रूबीवर हल्ला केला. त्या श्वानाने रूबीचं पोट फाडलं आणि पाठीचं हाडही मोडलं. होल्डमने सांगितलं की, रूबीच्या आतड्या बाहेर आल्या होत्या.

इतकंच नाही तर त्या श्वानाने माझ्या मुलीवरही हल्ला केला. तिचाही हात मोडला. होल्डमने सांगितलं की, आम्ही मुलीला आणि डॉगी रूबीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. पण त्यावेळी पशु चिकित्सालय बंद होतं. एक तासांच्या शोधानंतर आम्हाला एक हॉस्पिटल सापडलं. कायलीला औषध देण्यात आलं. तिला आराम मिळाला. पण रूबीची स्थिती गंभीर होती. तिची जीभ बाहेर आली होती आणि तोंडातून रक्तही येत होतं. आम्ही रूबीला एका कापडात गुंडाळून नेलं होतं. रात्रभर ऑपरेशन केलं गेलं. डॉक्टरांनी रूबीचा जीव वाचवला. पण हॉस्पिटलचं बिल धक्का देणारं होतं.

24 लाख रूपये आलं बिल

हॉस्पिटलने आधी रूबीच्या उपचाराचं बिल 6 हजार पाउंड म्हणजे साधारण 6 लाख रूपये सांगितलं. पण जेव्हा नंतर समजलं की, रूबीच्या पाठीच्या हाड मोडलं आहे तेव्हा बिल दुप्पट झालं. आयसीयूमध्ये ठेवल्याने रोज 40 हजार रूपये खर्च होत होते. 

जेव्हा हे लोक रूबीला घेऊन घरी येण्याची तयारी करत होते. तेव्हा समजलं की, त्यांचं बिल 24 लाख रूपये झालं आहे. होल्डम म्हणाली की, आम्हाला धक्का बसला. आमच्याकडे इतके पैसेही नव्हते. आम्हाला फक्त रूबीला वाचवायचं होतं. आता पैसेच नाही त्यामुळे आम्हाला घर गहाण ठेवावं लागलं. त्यातूनही बिल फेडता आलं नाही तर घर विकावं लागणार आहे.

टॅग्स :dogकुत्राJara hatkeजरा हटके