शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

लग्न सुरु असताना वधुने मध्येच थांबवल्या विधी, कारण होतं धक्कादायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 18:30 IST

एक प्रकरण दुबईतून समोर आलं आहे. यात वधूने लग्न सुरू असताना असं काही केलं, जे सर्वांनाच थक्क करणारं होतं.

तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर दररोज लग्नाचे कित्येक फोटो आणि व्हिडिओ (Viral Wedding Videos) तुम्हाला इथे पाहायला मिळत असतील. लग्नसमारंभात अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्या चर्चेचा विषय ठरतात. यात अनेकदा तर नवरी किंवा नवरदेवच असं काहीतरी करतात, ज्यामुळे त्यांचं लग्न फक्त पाहुण्यांमध्येच नाही तर जवळपास देशभरात चर्चेत राहातं. नुकतंच असंच एक प्रकरण दुबईतून समोर आलं आहे. यात वधूने लग्न सुरू असताना असं काही केलं, जे सर्वांनाच थक्क करणारं होतं (Bride Stops Marriage Rituals).

ही घटना दुबईमधील एका मॅरेज हॉलमधली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका डिजिटल कंटेंट प्रोड्युसर कंपनीच्या मालकिणीचं इथे लग्न होत होतं. ती नवरीच्या पोशाखात लग्नासाठी उभा होती आणि संपूर्ण मंडप सजला होता. दरम्यान, तिला अचानक आठवलं की तिने आपला वेडिंग ड्रेस पूर्णपणे परिधान केलेला नाही. लग्न सुरू असताना अचानक तिला आठवलं की तिच्या लग्नाच्या गाऊनमध्ये एक अटॅचमेंट लावायची राहून गेली आहे.

हे लक्षात येताच तिने जवळच उभा असलेल्या आपल्या मैत्रिणीला बोलावलं आणि यानंतर आपलं लग्न थांबवलं. तिथून कोणीतरी आत जाऊन तिचे कपडे आणले आणि मग वधूने ते परिधान केले. यादरम्यान वधूने लग्न थांबवलं आणि पूर्णपणे तयार झाल्यावर पुन्हा विवाहसोहळा सुरू झाला.

नंतर या घटनेबद्दल बोलताना नवरीने सांगितलं की मला माईक हातात घ्यायचा होता आणि माझ्या लग्नाचे सुरू असलेले विधी थांबवायचे होते. यानंतर मला माझा ड्रेस व्यवस्थित परिधान करायचा होता. हे सगळं माझ्यासाठी कठीण होतं. मी कधीच विचार केला नव्हता की माझं लग्न कसं असेल, मात्र आता माझ्या लग्नाचा दिवस, आमच्यातील कोणीच सहज विसरणार नाही. त्यादिवशी माझ्या आनंदात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेDubaiदुबई