शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

"नवरा लेट नाईट पार्टी करू शकतो पण..."; लग्नात नवरीची 'अशा' भन्नाट कॉन्ट्रॅक्टवर सही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 16:36 IST

सोशल मीडियावर नवरदेव आणि नववधूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नववधूच्या अनोख्या स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

लग्न म्हटलं की गमती-जमती या आल्याच. लग्नात अनोख्या डान्सचे व्हिडीओ हे जोरदार व्हायरल होतात. कधी वऱ्हाडी खूप मस्ती करताना दिसतात तर कधी नवरा-नवरी लग्नात खूप धमाल करतात. याच दरम्यान सोशल मीडियावर नवरदेव आणि नववधूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नववधूच्या अनोख्या स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

नववधू एका अनोख्या पद्धतीने आपल्या पतीला तिच्या मनाची गोष्ट सांगते आहे. त्याच वेळी, सर्व मित्र आणि नातेवाईकामुळे नवरदेवाला देखील आपल्या भावी पत्नीची इच्छा स्वीकारताना नकार देता येत नाही. सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, योग्य संधी पाहून नववधू तिच्या भावी पतीला हार घातल्यानंतर लगेचच कॉन्ट्रॅक्ट पेपरवर सही करायला लावते. नवरदेवही या कॉन्ट्रॅक्ट पेपरवर सही करतो. 

कॉन्ट्रॅक्ट पेपरवर काय लिहिले आहे ते ऐकल्यानंतर तुम्हालाही नवरीची ही स्टाईल आवडेल. यात आठ अटी आहेत. पहिली अटी म्हणजे एका महिन्यात फक्त एकच पिझ्झा खाल्ला जाईल, तर दुसऱ्या अटीमध्ये नेहमी घरच्या जेवणाला हो म्हणावे लागेल. रोज साडी नेसावी. लेट नाईट पार्टी करू शकता पण फक्त माझ्यासोबत, रोज जिमला जावे लागेल. रविवारचा नाश्ता बनवायचा आहे. प्रत्येक पार्टीत चांगला फोटो क्लिक करावा लागतो. दर 15 दिवसांनी शॉपिंगसाठी न्यावे लागेल असं म्हटलं आहे. 

लग्नाचं हे भन्नाट कॉन्ट्रॅक्ट पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी या व्हायरल व्हि़डीओवर प्रतिक्रिया दिली आहे. लग्नाच्या आधीच आता कॉन्ट्रॅक्ट करा असं सुचवलं आहे. तर काहींनी यातील अर्ध्या गोष्टी बरोबर आणि अर्ध्या चुकीच्या आहेत असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न