नववधुने हातावरील मेहंदीत पतीच्या ऐवजी काढून घेतला लाडक्या कुत्र्याचा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 11:38 AM2018-02-15T11:38:28+5:302018-02-15T11:38:52+5:30

एक अशी नववधु आहे तिने तिच्या हातावरील मेहंदीत नवऱ्याचा चेहरा काढण्याऐवजी तिच्या लाडक्या कुत्र्याचा चेहरा काढून घेतला.

bride got her pet dog’s face etched on her mehndi | नववधुने हातावरील मेहंदीत पतीच्या ऐवजी काढून घेतला लाडक्या कुत्र्याचा चेहरा

नववधुने हातावरील मेहंदीत पतीच्या ऐवजी काढून घेतला लाडक्या कुत्र्याचा चेहरा

Next

नवी दिल्ली- लग्नामध्ये काहीतरी खास करावं असं प्रत्येकाला वाटत असतं. वेंडिग लोकेशन ते कपड्यांपासून सगळंच एकदम परफेक्ट व्हावं, यासाठी सगळेच जण मेहनत घेतात. प्री वेडिंग फोटोशू, वेडिंग फोटो शूट, पोस्ट वेडिंग फोटो शूट असे सगळ्या प्रकराचे फोटो काढण्याचा कसरती होती. लग्नामध्ये मुली ज्याप्रमाणे त्यांच्या आऊटफिटला महत्त्व देतात तितकंच महत्त्व हातावर काढल्या जाणाऱ्या मेंहदीला दिलं जातं. हात भरून मेहंदी काढण्याचा सध्या ट्रेण्ड सुरू झाला आहे. पण एक अशी नववधु आहे तिने तिच्या हातावरील मेहंदीत नवऱ्याचा चेहरा काढण्याऐवजी तिच्या लाडक्या कुत्र्याचा चेहरा काढून घेतला. बघताच क्षणी कुणालाही आवडेल असा कुत्र्यांचा क्युट चेहरा तिने हातावर रेखाटून घेतला. 

जास्मिन संधू असं या नवविवाहितेचं नाव असून तिचं रिकी गील याच्याशी लग्न झालं. मेहंदीच्या दिवशी तिने मेहंदी आर्टिस्टला पतीचं नाव किंवा चेहरा काढायला न सांगता 'टॉबी' या तिच्या कुत्र्याचं कॅरीकेचर काढायला लावलं. जास्मिनच्या हातावर कुत्र्याचं चित्र पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मेहंदी आर्टिस्ट प्रशंताने दोन्ही हातावर एक-एक कुत्र्याचं चित्र काढलं. एका हातावर फक्त कुत्र्याचा चेहरा व दुसऱ्या हातावर लग्नाच्या तारखेची पाटी हातात धरलेलं कुत्र्याचं चित्र काढलं. 

माझ्या काकुच्या नवीन इमारतीमधील बेसमेंटमध्ये हा कुत्रा होता. त्याला पाहताच क्षणी मला व माझ्या आईला तो आवडला. त्यानंतर मी त्याला घरी आणलं. तेव्हापासून तो माझ्याकडे राहतो आहे. मेहंदीच्या संपूर्ण कार्यक्रमात तो उपस्थित होता. तसंच जास्मिनने ज्या रंगाचे कपडे परिधान केले होते त्याच रंगाचा 'बो' टॉबीलाही घातला होता, असं जास्मिनने म्हंटलं. 

Web Title: bride got her pet dog’s face etched on her mehndi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.