शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

लग्नात येण्यापासून बेस्ट फ्रेंडला घातली बंदी, कारण काय? तर बेस्ट फ्रेंड प्रेगनेंट होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 18:03 IST

एका महिलेने मात्र हद्दच केली. तिने आपल्या लग्नात सर्व मित्रमैत्रिणींना बोलावलं पण तिने आपल्या बेस्ट फ्रेंडलाच बॅन केलं.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा, अनमोल असा क्षण असतो. त्यामुळे आपल्या लग्नात आपलं कुटुंब, नातेवाईकांसह आपली बेस्ट फ्रेंडही असावीच असं बहुतेकांना वाटतं. पण एका महिलेने मात्र हद्दच केली. तिने आपल्या लग्नात सर्व मित्रमैत्रिणींना बोलावलं पण तिने आपल्या बेस्ट फ्रेंडलाच बॅन केलं (Bride best friend no entery in wedding).

या महिलेने आपल्या स्वतःचा रेडिटवर आपल्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे. काही आठवड्यांपूर्वीच तिने आपल्या लग्नाची तयारी करण्यासाठी आपल्या काही मित्रमैत्रिणींना बोलावलं. तिची प्री वेडिंग पार्टीही झाली. या सर्वात तिची बेस्ट फ्रेंडही होती. पण प्री-वेडिंग पार्टीत तिच्या बेस्ट फ्रेंडबाबत असं काही समजलं ज्यामुळे ती संतप्त झाली होती आणि तिने तिला आपल्या लग्नाच्या पार्टीच्या लिस्टमधून बाहेर केलं.

तिची बेस्ट फ्रेंड प्रेग्नंट होती. तिला याबाबत माहितीच नव्हतं. कारण ती असे कपडे घालायची ज्यामुळे तिचं बेबी बम्प दिसायचं नाही. आता बेस्ट फ्रेंड प्रेग्नंट होणार म्हणजे खरंतर तिला आनंद वाटायला हवा होता. कारण तिचं लग्न आणि आता तिची मैत्रिणीही प्रेग्नंट हा तर खरं दुहेरी आनंद होता. पण तिला याचा राग आला.

याचं कारण म्हणजे तिच्या प्री-वेडिंग पार्टीत तिच्याऐवजी तिच्या मैत्रिणीचीच जास्त चर्चा होती, तिच्याकडेच सर्वजण लक्ष देत होते.  तिच्या प्री वेडिंग पार्टीत सर्वजण तिलाच प्रेग्न्सीच्या शुभेच्छा देत होते  (everyone congratulated the bride’s best friend on her pregnancy) .

जेव्हा तिने आपल्या मित्रमैत्रिणींना बेस्ट फ्रेंडला शुभेच्छा देताना पाहिलं तेव्हा आपलं नटणंथटणं वायाच जाणार. सर्व पाहुणे तिला लग्नाच्या शुभेच्छा देण्याऐवजी मैत्रिणीलाच आई होण्याच्या शुभेच्छा देणार. तिच्याऐवजी तिची बेस्ट फ्रेंडचं सर्वांचं आकर्षण ठरेल. असं तिला वाटू लागलं.

त्यामुळे प्री-वेडिंग पार्टीतच तिने आपल्या मित्रमैत्रिणींना सुनावलं. तुम्ही लोक माझ्या लग्नासाठी आला आहात ना तिच्या प्रेग्न्सीच्या पार्टीसाठी. आता ही परिस्थिती आहे मग लग्नात काय होणार. कारण नवरदेवाचे नातेवाईकही त्या बेस्ट फ्रेंडला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होते, त्यामुळे नवरीबाईने मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपल्या ब्रेस्ट फ्रेंडलाच लग्नात येण्यास बंदी घातली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके