शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीपासून घटस्फोट घेतला....आनंद साजरा करण्यासाठी बंजी जंपिंग करण्यास गेला, दोरी तुटली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 12:24 IST

Bungee Jumping By Man: एका व्यक्तीने पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी तो टूरवर निघाला आणि बंजी जंपिंग करण्यासाठी पोहोचला. पण त्याने बंजी जंपिंगसाठी जशी उडी घेतली तेव्हा ती दोरी तुटली.

Bungee Jumping By Man: अ‍ॅडव्हेंचर आवडणाऱ्या लोकांना सतत काहीतरी रोमांचक करायचं असतं. बंजी जंपिंगची क्रेझ सध्या सगळीकडे वाढली आहे. हा एक फारच शानदार आणि नेहमी लक्षात राहणारा अनुभव असतो. पण यासाठी खूप हिंमत असावी लागते. यासंबंधी एक अशी घटना समोर आली जी वाचून सगळेच हैराण झाले आहेत. एका व्यक्तीने पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी तो टूरवर निघाला आणि बंजी जंपिंग करण्यासाठी पोहोचला. पण त्याने बंजी जंपिंगसाठी जशी उडी घेतली तेव्हा ती दोरी तुटली.

70 फूट उंचावरून मारली उडी

ही घटना पोर्तुगालमध्ये राहणाऱ्या राफेलसोबत घडली. 22 वर्षीय हा तरूण कौटुंबिक वादांमुळे हैराण होता आणि अशात त्याने पत्नीला घटस्फोट दिला. या घटस्फोटाचा आनंद साजरा करण्यासाठी तो ब्राझीलला फिरण्यासाठी गेला. राफेलने बंजी जंपिंग करण्याचा प्लान केला. पण त्याला याचा अजिबात अंदाज नव्हता की, त्याच्यासोबत काय होणार आहे. राफेलने जशी 70 फूट उंचावरून उडी मारली त्याची दोरी तुटली.

गंभीर जखमी झाला

त्यानंतर तो इतक्या उंचावरून बघता बघता खोल दरीत पडला. लोकांना वाटलं की, त्याचा मृत्यू झाला असेल. पण सुरक्षा आणि बचाव दलाच्या लोकांच्या काही तासांच्या मेहनतीनंतर त्याला दरीतून बाहेर काढण्यात आलं. पण त्याची स्थिती गंभीर होती. त्याची जवळपास सगळीच हाडे मोडली होती. त्याचा श्वास सुरू होता. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

हेही सांगण्यात आलं की, हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर तरूणाने स्वत: सांगितलं की, तो त्याच्या घटस्फोटाचा आनंद साजरा करण्यासाठी आला होता. मला सगळ्या पद्धतीने जीवनाचा आनंद घ्यायचा होता. दरम्यान त्याच्यासोबत ही घटना घडली. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Brazilब्राझीलJara hatkeजरा हटके