शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

बोंबला! हनीमूनबाबत बॉयफ्रेन्डने व्यक्त केली 'अजब' इच्छा, ऐकून होणाऱ्या बायकोच्या पायाखालची सरकली जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 13:18 IST

Weird Honeymoon Plan : ब्रिटनमधील एका कपलचा हनीमून प्लान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पुरूषाने रिलेशनशिप पोर्टलवर हनीमून प्लानबाबत सांगितलं, ज्यानंतर यूजर्स त्याला शिव्या घालत आहेत. 

हनीमून कोणत्याही विवाहित कपलसाठी खास संधी असतो. या खास क्षणांमध्ये दोन लोक एकमेकांच्या जवळ येतात आणि आपल्या लाइफ पार्टनरसोबत नवनवीन आठवणी तयार करतात. अशात ब्रिटनमधील एका कपलचा हनीमून प्लान (Honeymoon Plan) सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पुरूषाने रिलेशनशिप पोर्टलवर हनीमून प्लानबाबत सांगितलं, ज्यानंतर यूजर्स त्याला शिव्या घालत आहेत. 

पुरूषाने लिहिलं की, 'मला माझ्या हनीमूनवर माझ्या काही मित्रांना सोबत घेऊन जायचे आहे. मी काही चूक करतोय का?'. त्याने लिहिलं की, '७ महिन्यात माझं लग्न होणार आहे. मी आणि माझी होणारी बायको ज्या ठिकाणी हनीमूनला जात आहोत, ते ठिकाणी नेहमीच माझ्या मित्रांचं ड्रिम डेस्टिनेशन होतं. जेव्हा मी त्यांना हे सांगितलं तेव्हा ते म्हणाले की, त्यांनाही यायचं आहे'.

'मी त्यांना म्हणालो की, मी असा हनीमून प्लान करू शकतो, ज्या मी माझ्या सर्व मित्रांना नेऊ शकतो. माझ्या मित्रांना माझी ही आयडिया खूप आवडली. आम्हा सर्वांना हे ठिकाण फार आवडतं. पण दुर्दैवाने आम्ही एकत्र त्या ठिकाणी जाण्याचा कधी प्लान करू शकलो नाही. पण यावेळी हा प्लान सहजपणे बनत आहे. त्यामुळे मला वाटलं की, मित्रांनाही सोबत नेण्याची ही चांगली संधी आहे'.

या पुरूषाने त्याच्या या प्लानबाबत त्याच्या होणाऱ्या बायकोला सांगितलं तर ती त्याच्यावर ओरडली. त्याने लिहिलं की, 'माझी आयडिया ऐकताच माझी होणारी बायको माझ्यावर वेड्यासारखी ओरडू लागली होती. ती म्हणाली की, मला तिच्याशिवाय सर्वांची काळजी आहे. मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की हा प्लान आधीपासून नव्हता. अचानक वेळेवर बनला. मी फक्त इतकाच विचार  केला की, माझ्या मित्रांना फिरण्याची संधी मिळेल. इतकंच काय तर मी तिलाही हे म्हणालो की, ती तिच्याही मित्र-मैत्रिणींना आणू शकते'.

'माझी होणारी बायको म्हणाली की, असा मूर्खपणाचा विचार तू करूही कसा शकतो? माझी इतकी चांगली आयडिया तिला भयानक वाटली. तिने माझ्यावर आरोप लावला की, मला तिची अजिबात काळजी नाहीये. ती म्हणाली की, हनीमूनला फक्त आपण दोघेच गेलो पाहिजे. आणि फ्रेन्डशिप ट्रिप बनवली. ती मला शिव्या देत म्हणाली की, मी तिला न विचारता मित्रांसोबत याबाबत चर्चा तरी कशी केली. मला तिचं हे पटलं. मी आधी तिला विचारायला हवं होतं. पण मला नव्हतं माहीत की तिला माझ्या आयडियाचं इतकं वाईट वाटेल. मला वाटलं ती याकडे गंमत म्हणून बघेल'.

लोक या पोस्टवरून पुरूषाला खूप काही ऐकवत आहेत. एकाने लिहिलं की, 'हा तुझा हनीमून आहे मूर्खा. तुझ्यासोबत लग्न करून तिचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे'. एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'या पॉइंटवर तुझ्या होणाऱ्या बायकोने तुझ्यासोबत लग्नाच्या विचाराबाबत पुन्हा विचार करायला हवा'. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया