तरूणाने एक्स गर्लफ्रेंडचा घेतला असा सूड, वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 03:07 PM2024-04-27T15:07:23+5:302024-04-27T15:07:55+5:30

ही घटना गेल्या आठवड्यात रात्री 9 वाजता घडली. जेव्हा इज्मिरच्या बालकोवा जिल्ह्यात सिमेन स्ट्रीटवर एक अपार्टमेंट बिल्डिंगसमोर दोन डझनपेक्षा जास्त जेवणाचे पार्सल आले.

Boyfriend allegedly pranks ex-girlfriend by sending over 50 cash on delivery food orders to her door | तरूणाने एक्स गर्लफ्रेंडचा घेतला असा सूड, वाचून व्हाल अवाक्...

तरूणाने एक्स गर्लफ्रेंडचा घेतला असा सूड, वाचून व्हाल अवाक्...

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडमध्ये किंवा विवाहित जोडप्यांमध्ये दगा देण्याच्या अनेक घटना रोज जगभरातून समोर येत असतात. अशात दगा मिळालेली जोडीदार एकतर रडत बसतात किंवा मग सूड घेण्याचा प्लान करतात. अशीच एक घटना तुर्कीमधून समोर आली आहे. येथील इज्मिरमध्ये एका व्यक्तीने आपल्या एक्स गर्लफ्रेंडवर असा काही सूड उगवला की ही घटना चर्चेत आली.

ही घटना गेल्या आठवड्यात रात्री 9 वाजता घडली. जेव्हा इज्मिरच्या बालकोवा जिल्ह्यात सिमेन स्ट्रीटवर एक अपार्टमेंट बिल्डिंगसमोर दोन डझनपेक्षा जास्त जेवणाचे पार्सल आले. वेगवेगळ्या रेस्टॉरंटचे पार्सल आणि 50 पेक्षा जास्त फूड डिलिव्हरी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी कॅमेरात कैद केली. हे सगळं जेवण एकाच महिलेसाठी आलं होतं, पण तिला काय झालं हेच समजत नव्हतं.

ही घटना लगेच मीडियाच्या नजरेत आली आणि त्यांची शोध सुरू केला. तेव्हा त्यांना समजलं की, एका महिलेसाठी हे सगळे पार्सल एकी व्यक्तीने फेक नावाने बुक केले होते. या व्यक्तीने अशी व्यवस्था केली की, या सगळ्या ऑर्डरचे पैसे महिलेला द्यावे लागेल. यावरून महिलेचा डिलिव्हरी बॉयसोबत वाद झाला. नंतर समजलं की, व्यक्ती महिलेचा एक्स बॉयफ्रेंड होता आणि सूड घेण्यासाठी त्याने असं केलं.

व्यक्तीने ऑर्डर करण्यासाठी वेगळ्या नंबरचा वापर केला. अशात काही रेस्टॉरंटने वेगळा नंबर दिसला म्हणून फोन करून चौकशीही केली. पण त्यांना काही समजलं नाही. झालं असं की, जवळपास एकाचवेळी एकाच पत्त्यावर 50 पेक्षा जास्त ऑर्डर पोहोचल्या आणि डिलिव्हरी बॉय बिल्डींगसमोर पेमेंटची वाट बघत होते.

महत्वाची बाब इतकं सगळं होऊनही कुणी पोलिसात तक्रार देण्याचा विचार केला नाही. कुणी संशयिताला शोधलंही नाही. मीडियाने चौकशी केल्यावर एका रेस्टॉंरंटने सांगितलं की, त्यांनी या ऑर्डरची माहिती देण्यासाठी फोन केला होता. पण तोपर्यंत जेवण पॅक झालं होतं. सगळ्या ऑर्डर परत आल्या आणि जास्तीत जास्त जेवण फेकावं लागलं. 

Web Title: Boyfriend allegedly pranks ex-girlfriend by sending over 50 cash on delivery food orders to her door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.