शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

लव्ह इज इन द एअर! चक्क विमानात फिल्मी स्टाईल प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 1:26 PM

आयुष्यरुपी प्रवासाच्या नवा टप्प्याला विमानातून सुरुवात

इंदूर: गुडघ्यावर बसून 'माझी होशील का?', असं चारचौघांमध्ये केलेलं प्रपोज म्हणजे बॉलिवूडमधील चित्रपटांचं वैशिष्ट्य. चित्रपटानंतर असे प्रपोज अनेकांनी त्यांच्या आयुष्यात केले. मात्र कितीही धीर एकवटला तरी, चारचौघात ती नाही म्हणाली, तर काय?, ही भीती मनात असतेच. मात्र इंदूरहून गोव्याला जाणाऱ्या विमानात एका प्रेमवीरानं चक्क गुडघ्यावर बसून प्रवासी आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमोर त्याच्या मैत्रिणीला प्रपोज केलं. समोरच्या मुलीनं होकार दिल्यानं त्याची ही सर्व मेहनत कामी केली. इंदूरहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात रविवारी नरेंद्र अनानदानी नावाचा तरुण चढला. नरेंद्रची मैत्रीण गोव्याला जात होती. तिच्यासाठी तो खास नागपूरहून इंदूरला आला होता. मैत्रीण सीटजवळ पोहोचताच विमानातील स्पीकरवर तिला नरेंद्रचा आवाज ऐकू आला. नरेंद्रचा आवाज ऐकताच तरुणी ज्या ठिकाणाहून घोषणा केली जाते, त्या दिशेनं चालू लागली. तितक्यात तिला नरेंद्र दिसला. यानंतर नरेंद्रनं त्याच्या मैत्रिणीला सर्व प्रवाशांसमोर गुडघ्यावरुन बसून प्रपोज केलं. यावेळी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही त्याला साथ दिली. 'विल यू मॅरी मी?' असे फलक हाती धरुन कर्मचारी उभे राहिले. नरेंद्रनं प्रपोज करण्यासाठी घेतलेले हे कष्ट पाहून मैत्रिणीलाही आनंद झाला. तिनं लगेच होकार दिला आणि ही 'लव्ह इज इन द एअर' प्रकारातील घटना पाहणाऱ्या प्रवाशांनी दोघांचंही अभिनंदन केलं. 'प्रवास करणाऱ्या मुलीला नरेंद्र तिकडे येणार असल्याची कोणतीही कल्पना नव्हती. तिनं नेहमीप्रमाणे विमानात प्रवेश केला,' अशी माहिती इंदूर विमानतळाच्या संचालिका आर्यमा संन्याल यांनी दिली. या फिल्मी स्टाईल स्टाईल प्रपोजसाठी नरेंद्रनं मोठी तयारी केली होती. यासाठी त्यानं विमानातील कर्मचाऱ्यांना विनंती केली होती. अखेर नरेंद्रनं घेतलेले सर्व कष्ट कामी आले अन् विमानातून त्याच्या आयुष्यरुपी प्रवासाचा नवा टप्पा सुरू झाला.  

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टAirportविमानतळ