शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बॉस असावा असा! 4 दिवस काम, 3 दिवस आराम; 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 21:07 IST

कर्मचार्‍यांना कामासाठी आठवड्याचे चारच दिवस ऑफिसमध्ये यायला सांगितलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीची सुट्टी देताना पगार कापणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.

कोणत्याही कंपनीसाठी त्यांचे कर्मचारी ही खूप मोठी संपत्ती असते. कंपनी आणि बॉस नेहमीच कर्मचार्‍यांना आनंदी ठेवण्यासाठी नियोजन करत असतात. कधी वैद्यकीय सेवेचे फायदे, सहली किंवा विविध पॉलिसीज राबवून कर्मचार्‍यांना खूश करतात. कधी-कधी व्हेकेशनसाठी वेगळी सुट्टी मंजूर करतात. असंच काहीस आता घडलं आहे. एका बॉसने आपल्या कर्मचार्‍यांना एक्स्ट्रा सुट्टी देऊन खूश केलं आहे.

अवर कम्युनिटी (Our Community) नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या बॉसने म्हणजेच डेनिस मोरियरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. डेनिस यांनी कर्मचार्‍यांना कामासाठी आठवड्याचे चारच दिवस ऑफिसमध्ये यायला सांगितलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीची सुट्टी देताना पगार कापणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. कर्मचारी आपल्या बॉसच्या निर्णयाने खूप आनंदी आहेत.

कंपनीत आठवड्याचे चार दिवस काम करण्याचं धोरण 

डेनिस मोरियरी यांनी आपल्या कंपनीत आठवड्याचे चार दिवस काम करण्याचं धोरण राबवायला सुरुवात केली आहे. या पॉलिसीचा त्यांना खूपच फायदा झाल्याचं समजतं. डेली स्टारच्या वृत्तानुसार डेनिस असं म्हणतात, की या पॉलिसीचं त्यांच्या कर्मचार्‍यांनी स्वागत केलं. ऑगस्ट महिन्यापासून या धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू आहे. कर्मचार्‍यांचं मन राखण्यासाठी त्यांनी ही ट्रायल पॉलिसी कायमची लागू करण्याचं ठरवलं आहे. 

"कामाचे तास 20 टक्क्यांनी कमी होताहेत पण पगार पूर्ण मिळणार"

स्कीमविषयी बोलताना डेनिस म्हणाले की, ही स्कीम ऑफिससाठी उपयुक्त आहेच; पण कर्मचार्‍यांसाठीही उत्तम आहे. यामुळे कर्मचार्‍यांना अपेक्षित स्वातंत्र्य मिळेल. तसंच उरलेले 3 दिवस ते एखादा छंद, आवड जोपासतील. आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवतील. सध्या ही 6 महिन्यांची ट्रायल पॉलिसी आहे पण ही पॉलिसी पुढेही सुरू राहील. या नव्या धोरणामुळे कंपनीकडून कर्मचार्‍यांच्या कामाचे तास 20 टक्क्यांनी कमी होताहेत पण पगार मात्र पूर्ण मिळणार आहे. फक्त आठवड्यातल्या या 4 दिवसांचे कामाचे तास वाढवण्यावर भर दिला जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jara hatkeजरा हटके