ऑस्कर सोहळ्याच्या ठिकाणी बॉम्बची अफवा
By Admin | Updated: February 20, 2015 21:25 IST2015-02-20T17:12:42+5:302015-02-20T21:25:25+5:30
बॉम्ब असल्याची सुचना मिळताच पोलिसांनी येथील परीसराची कसून तपासणी केली. तपासानंतर ही अफवा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

ऑस्कर सोहळ्याच्या ठिकाणी बॉम्बची अफवा
>ऑनलाइन लोकमत
लॉस अँजेलीस, दि. २० - बॉम्ब असल्याची सुचना मिळताच पोलिसांनी येथील परीसराची कसून तपासणी केली. तपासानंतर ही अफवा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
रविवारी दि. २२ फेब्रुवारी येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याने देश विदेशातील पर्यटक याठिकाणी उपस्थित असतानाच बॉम्बच्या अफवेने नागरिक आणि पर्यटकांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:०० वाजता पोलिसांनी फ्रँकलीन येथून एका व्यक्तीला अटक केली असता त्याने गाडीमध्ये स्फोटक पदार्थ असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत बॉम्ब विनाशक पथकाच्या रोबोट द्वारे त्याच्या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये सिलंडर होता. परंतू त्यात स्फोटक पदार्थ अढळले नाहित. दरम्यान पोलिसांनी येथे आलेल्या पर्यटकांना आणि नागरिकांना घटनास्थळापासून दूर हलवले. स्फोटक पदार्थ असल्याची खोटी माहिती देणा-या व्यक्तीची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याला हॉलिवूड येथील पोलीस स्थानकामध्ये अधिक चौकशी करता पाठवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेचा रविवारी होणा-या कार्यक्रमावर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचे स्थानिक पोलीस अधिका-यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.