शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रियकरासोबत लव्ह मॅरेज, 45 दिवसांनी एक्स बॉयफ्रेन्डसोबत फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 17:29 IST

Bride ran away with ex boyfriend after marriage : मीडिया रिपोर्टनुसार, ही धक्कादायक घटना पटणाच्या नौबतपूरची आहे. इथे राहणारा 22 वर्षीय  तरूण दोन वर्षाआधी एका 20 वर्षी तरूणीच्या प्रेमात पडला होता.

बिहारमध्ये (Bihar) एका महिलेने लव्ह मॅरेजच्या 45 दिवसांनंतर असा काही कारनामा केला की, या घटनेची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली. तरूणीने आधी तिच्या पसंतीच्या तरूणासोबत लव्ह मॅरेज केलं आणि मग लग्नाच्या 45 दिवसांनंतर पैसे व दागिने घेऊन ती तिच्या एक्स बॉयफ्रेन्डसोबत फरार (Bride ran away with ex boyfriend after marriage ) झाली. आता लोकांना प्रश्न पडला आहे की, तिने हे कसं प्रेम केलं? चला जाणून घेऊ काय आहे घटना...

2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते

मीडिया रिपोर्टनुसार, ही धक्कादायक घटना पटणाच्या नौबतपूरची आहे. इथे राहणारा 22 वर्षीय  तरूण दोन वर्षाआधी एका 20 वर्षी तरूणीच्या प्रेमात पडला होता. दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम होतं की, या नात्यावर नाराज कुटुंबियांनाही त्यांनी मनवलं आणि सात फेरे घेऊन लग्नाच्या बंधनात अडकले. लग्न करून ते पती-पत्नी झाले. पण लग्नाच्या 45 दिवसांनंतर सोमवारी जेव्हा पती झोपलेला होता तेव्हा तरूणी घरातून पैसे आणि दागिने घेऊन तिच्या एक्स बॉयफ्रेन्डसोबत पळून गेली.

किती होती रक्कम आणि दागिने

तरूणाचं नाव सत्यानंद आणि तरूणीचं नाव रानी कुमारी आहे. दोघांनी 27 एप्रिल 2022 ला लव्ह मॅरेज केलं होतं. या घटनेमुळे धक्का बसलेल्या पतीने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, तिने तिजोरीचं लॉक तोडून 20 हजार रूपये रोख, मंगळसूत्र आणि इतर दागिनेही सोबत नेले. हे सगळं तिला लग्नात देण्यात आलं होतं. पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

पतीलाही माहीत होतं तिचं आधीचं अफेअर

पतीने आरोप केला की, लग्नानंतर सुमन जेव्हा सासरी आली तेव्हा रात्ररात्रभर ती एका दुसऱ्या तरूणासोबत बोलत होती. जेव्हा त्याने याचा विरोध केला तेव्हा ती पतीचं काही ऐकायला तयार नव्हती. त्यानंतर काही दिवसांनी ती घरातून पैसे आणि दागिने घेऊन फरार झाली.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न