बंगाली भाषा अमेरिकेतही प्रिय

By Admin | Updated: May 25, 2014 23:23 IST2014-05-25T23:22:41+5:302014-05-25T23:23:40+5:30

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या एका महाविद्यालयात बंगाली भाषेतील अभ्यासक्रमाला मोठी लोकप्रियता मिळत आहे.

The Bengali language is also beloved in America | बंगाली भाषा अमेरिकेतही प्रिय

बंगाली भाषा अमेरिकेतही प्रिय

न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या एका महाविद्यालयात बंगाली भाषेतील अभ्यासक्रमाला मोठी लोकप्रियता मिळत आहे. येथे विद्यार्थ्यांमध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यकृती मोठ्या उत्साहाने वाचल्या जात आहेत. सिटी कॉलेज आॅफ न्यूयॉर्कने बंगाली भाषेतील अभ्यासक्रमाची सुरुवात केली आहे. जगभरात कोट्यवधी लोक बंगाली भाषा बोलतात. महाविद्यालयाच्या विदेशी भाषा व साहित्य विभागाचे प्रमुख कार्लोस रिबोबो यांनी सांगितले की, आमच्याकडे मोठ्या संख्येने बंगाली भाषक आहेत. आतापर्यंत त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या नव्हत्या. इंग्रजी, स्पॅनिश आणि चिनीनंतर चौथी सर्वाधिक लोकप्रिय मूळ भाषा म्हणून बंगालीचा उल्लेख होतो. अमेरिकी महाविद्यालयातील पदवीधरांमध्ये बंगाली भाषेतील एक वर्षाचा अभ्यासक्रम लोकप्रिय आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The Bengali language is also beloved in America