शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधी ब्युटी पार्लरमध्ये पोहोचली वधू, ४० हजारांचा मेकअप केला आणि झाली फरार, त्यानंतर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 14:50 IST

Bride Makeup: लग्नाच्या काही आठवडे आधी एक वधू ब्युटीपार्लरमध्ये गेली. तिथे तिने हेवी मेकअप करून घेतला. त्याचं बिल चाळीस हजारांहून अधिक झालं. मात्र ती ब्युटी पार्लरमधून पैसे न देताच गुपचूप फरार झाली.

लंडन - लग्नाच्या हंगामातील अनेक कहाण्या व्हायरल होत असतात. अनेकदा वधू-वरांमधील गमती जमतींचे व्हिडीओ चर्चेचे केंद्र बनतात. अनेकदा वऱ्हाडी मंडळीही प्रसिद्धीच्या झोतात येतात. अशीच एक घटना समोर आली आहे. लग्नाच्या काही आठवडे आधी एक वधू ब्युटीपार्लरमध्ये गेली. तिथे तिने हेवी मेकअप करून घेतला. त्याचं बिल चाळीस हजारांहून अधिक झालं. मात्र ती ब्युटी पार्लरमधून पैसे न देताच गुपचूप फरार झाली.

वधू मंडपातून पसार झाल्याच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. मात्र सदर तरुणी ब्युटी पार्लरमधून पैसे न देताच पसार झाली. ही घटना ब्रिटनमधील यॉर्क शहरात घडली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार एका महिलेचा विवाह होणार होता. मात्र तिच्या विवाहाला काही अवधी बाकी होता. मात्र तिने मेकअप करण्याचा निर्णय खूप आधी घेतला होता. ती तिच्या एका बहिणीसोबत ब्युटीपार्लरमध्ये पोहोचली. तिथे तिने मेकअप करवून घेतला.

तिच्या मेकअपचं बिल तब्बल ४० हजार रुपये झालं. ४० हजारांचा मेकअप करून घेतल्यावर ती बसून राहिली आणि संधी साधून तिथून पळून गेली. ब्युटी पार्लर चालवणाऱ्यांना जेव्हा याबाबत समजलं तेव्हा त्यांनी तिला संपूर्ण पार्लरभर शोधलं मात्र ती दिसली नाही. त्यानंतर सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता ती मेकअपसह पैसे न देताच फरार झाली. आधी सर्वांनी तिची वाट पाहिली. मात्र जेव्हा ती आली नाही तेव्हा पार्लरवाल्यांनी सीसीटीव्ही फुटेजमधून तिचे फोटो छापून घेतले.

त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पोलिसांनी आरोपी तरुणीचा शोध सुरू केला. या प्रकरणात पोलिसांकडून कुठलंही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार या तरुणीला पकडण्यात आले आहे. तसेच तिच्याकडून पैसे घेण्यात आले आहेत. दरम्यान, तिच्या लग्नाला अजूनही एक महिन्यानूत अधिक अवधी असल्याची माहिती उघड झाली आहे.  

टॅग्स :marriageलग्नLondonलंडनJara hatkeजरा हटके