या अंधश्रध्देमुळे मुंबईतील हॉटेल्समध्ये नाही १३वा माळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 04:15 PM2017-10-26T16:15:21+5:302017-10-26T19:23:33+5:30

अशिक्षित लोकांकडून अनेक अंधश्रद्धेच्या गोष्टी आपण ऐकतो पण जर सुशिक्षित लोकांनीच अंधश्रद्धेला खतपाणी घातलं तर नवलच वाटतं.

Because of this superstition, there are no 13 or more hotels in Mumbai | या अंधश्रध्देमुळे मुंबईतील हॉटेल्समध्ये नाही १३वा माळा

या अंधश्रध्देमुळे मुंबईतील हॉटेल्समध्ये नाही १३वा माळा

ठळक मुद्देभारताला अंधश्रद्धेने पोखरलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.काही अशा अंधश्रध्दा उच्चभ्रू लोकांकडून मानल्या जातात की त्या गोष्टी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कित्येक हॉटेल्स किंवा मोठ्या इमारतींमध्ये ही गोष्ट प्रकर्षाने टाळली जाते.

मुंबई- भारताला अंधश्रद्धेने पोखरलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण भारतातल्या आणि मुख्यत्वे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात अशा काही गोष्टी उच्चभ्रू लोकांकडून मानल्या जातात की त्या गोष्टी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मुंबईतील कित्येक श्रीमंत हॉटेल्समध्ये १३ वा माळाच नाही. म्हणजे या हॉटेलांनी आकाशाला गवसणी घातली असली तरी १३ वा माळा स्किप करून थेट १४ वा माळा यांनी बनवला आहे.

अशिक्षित लोकांकडून अनेक अंधश्रद्धेच्या गोष्टी आपण ऐकतो पण जर सुशिक्षित आणि उच्चभ्रू लोकांनीच अंधश्रद्धेला खतपाणी घातंल तर नवलच वाटतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, १३ वा माळा न बांधण्याचा किंवा १२ व्या माळ्यानंतर थेट १४ माळा ठेवण्यामागे हॉटेल मालकांची आणि वास्तूविशारदांची काय भूमिका असू शकते. असं म्हणतात की १३ हा क्रमांक अशुभ मानला जातो. म्हणून कित्येक हॉटेल्स किंवा मोठ्या इमारतींमध्ये १३ क्रमांचा माळाच नसतो.

दि ट्रिडेंट हॉटेल, नरिमन पॉईंट

नरिमन पाँईंटमधल्या दि ट्रिडेंट हॉटेलमध्ये १३ वा माळा नाहीए. त्याचं कारण म्हणजे १३ क्रमांक अशुभ मानला जातो. त्याचप्रमाणे १३ वा शुक्रवार अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलं जातं. म्हणजे या हॉटेलचा मालक ट्रिसकायडेकाफोबिया या तत्वावर विश्वास ठेवतो. ट्रिसकायडेकाफोबिया म्हणजे १३ क्रमांकाची भीती असणे. ग्रीक भाषेपासून हा शब्द तयार करण्यात अाला अाहे. ट्रिस म्हणेज १३, काय म्हणजे आणि, डेका म्हणजे १० व फोबिया म्हणजे भीती याचा अर्थ १३ आणि १० क्रमांकाची भीती असणं. असं म्हणतात की या हॉटेलमध्ये १३ व्या माळ्यावर अनेक पर्यटकांना विचित्र आवाज येत होते. शिवाय तेथील कर्मचाऱ्यांनाही १३ व्या माळ्यावर भयानक काहीतरी असल्याचं सतत जाणवायचं, म्हणून या इमारतीतून १३ क्रमांक काढून थेट १४ वा क्रमांक देण्यात आला.

हॉचेस्ट हाऊस, नरिमन पाँईंट

या हॉटेलमधील ग्राहकांना १३व्या माळ्यावर अनेक विचित्र आवाज येत असल्याचे अनुभव आले. म्हणून यांनीही १३ वा माळा स्किप केला असं म्हटलं जातं.

मेकर चेंबर्स ४

मेकर चेंबर्स हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या असं निदर्शनास आलं की, तेराव्या माळ्यावरील लाईट्स आपोआप चालू बंद होतात. त्या लाईट्स तेथे सतत चालू ठेवण्याचीच सेटींग करण्यात आली असली तरी त्या बंद होतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये या माळ्याविषयी सतत भीती असते.

या इमारती फक्त मुंबईतीलच झाल्या. पण भारतातही अशा अनेक इमारती आहेत जिथे अशाप्रकारची अंधश्रद्धा पाळली जाते. माणसं आभाळाला टेकतील अशा इमारती बांधतात पण अशा समजुतींमुळे त्यांचे विचार नेहमीच खालच्या पायरीवरच राहतात असं म्हणायला हरकत नाही.

सौजन्य - www.rvcj.com

Web Title: Because of this superstition, there are no 13 or more hotels in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.