शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ज्या मुलीचं बालपणापासून संगोपन करतो पिता, ती तरूण होताच बनतो तिचा पती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 14:20 IST

Weird Marriage Rituals : आज आम्ही तुम्हाला अशाच जमातीबाबत आणि त्यांच्या कुप्रथेबाबत सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. ही जमात बांगलादेशमध्ये राहते.

Weird Marriage Rituals : जगभरात वेगवेगळ्या जमाती आहेत. काही जंगलांमध्ये राहतात तर काही गाव-शहरांमध्ये राहतात. या जमाती इतर लोकांपासून फार वेगळ्या असतात. त्यांच्या प्रथा, रितीरिजाव, राहणीमान सगळंच वेगळं असतं. त्यांच्या या प्रथा वेगवेगळ्यांनी कारणांनी चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच जमातीबाबत आणि त्यांच्या कुप्रथेबाबत सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. ही जमात बांगलादेशमध्ये राहते.

बांगलादेशातील मंडी जमातीबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत. या जमातीमध्ये एक अजब प्रथा आहे. जेव्हा एखादा पुरूष कमी वयात विधवा झालेल्या महिलेसोबत लग्न करतो, तेव्हा हेही ठरवलं जातं की, त्या महिलेच्या मुलीसोबत तो पुढे जाऊन लग्न करेल. महिलेला पहिल्या लग्नातून झालेल्या मुलीसोबत हे लग्न केलं जातं. बालपणी ती मुलगी ज्या व्यक्तीला बाबा म्हणून हाक मारते, पुढे जाऊन तिच व्यक्ती तिचा पती बनते. ही कुप्रथा आजही सुरू आहे.

सावत्र वडिलांसोबत लग्न

या कुप्रथेसाठी वडील सावत्र असणं गरजेचं असतं. या कुप्रथेची सुरूवात तेव्हा होते जेव्हा एखादी महिला कमी वयातच विधवा होते. त्यानंतर दुसरा पुरूष तिच्यासोबत याच अटीवर लग्न करतो की, पहिल्या लग्नातून झालेल्या तिच्या मुलीसोबत तो पुढे जाऊन लग्न करेल. यामागचं लॉजिक असं सांगितलं जातं की, कमी वयाचा पती आपली पत्ननी आणि मुलगी दोघींचं जास्त काळ संरक्षण करू शकतो. धक्कादायक बाब म्हणजे आजही ही कुप्रथा इथे सुरू आहे. 

अनेक मुलींचं जीवन उद्ध्वस्त

या कुप्रथेमुळे मंडी जमातीतील अनेक मुलींचं जीव उद्ध्वस्त झालं आहे. आपली कहाणी सांगत मंडी जमातीतील ओरोलाने बरेच धक्कादायक खुलासे केले होते. तिने सांगितलं होतं की, जेव्हा ती खूप लहान होती, तेव्हा वडिलांना गमावलं होतं. त्यानंतर आईने नॉटेन नावाच्या व्यक्तीसोबत दुसरं लग्न केलं. ओरोलाला तिचे दुसरी वडील पसंत होते. तोही तिची खूप काळजी घेत होता. मात्र जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिला अशी गोष्ट समजली जी ऐकून तिच्या पायाखालची जमिनच सरकली. तिला समजलं की, जेव्हा ती तीन वर्षांची होती तेव्हाच तिचं लग्न नॉटेन नावाच्या व्यक्तीसोबत लावण्यात आलं होतं. तोच तिचा वडील होता. अशा अनेक मुलींचं जीवन उद्ध्वस्त झालंय.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेmarriageलग्न