शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं तर! अडीच फूट उंचीच्या अजीमला मिळाली नवरी, वाचा काय करते मुलगी आणि बघा तिचा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 09:44 IST

Azeem Mansoori Engagement : आता अजीम मंसूरीने उत्तर प्रदेशच्या हापुडमध्ये राहणाऱ्या एका मुलीला आपली जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतलाय.

शामलीचा राहणारा अडीच फूट उंची असलेला तरूण अजीम मंसूरीने (Azeem Mansoori)  काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यासाठी नवरी शोधण्याची मागणी केली होती. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याच्याकडे अनेक मुलींची लाइन लागली होती. आता अजीम मंसूरीने उत्तर प्रदेशच्या हापुडमध्ये राहणाऱ्या एका मुलीला आपली जीवनसाथी बनवण्याचा निर्णय (Azeem Mansoori Engagement) घेतलाय. या मुलीची उंचीही त्याच्या इतकीच आहे. अजीमच्या होणाऱ्या नवरीचा फोटो पहिल्यांदाच समोर आला आहे.

नुकताच हापुडच्या बुशरासोबत अजीम मंसूरीचा साखरपुडा झाला. २० वर्षीय बुशरा बी.कॉम फर्स्ट इअऱला शिकत आहे आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघेही लग्न करतील. कमी उंचीमुळे अजीम मंसूरीचं लग्न जुळण्यास अडचण येत होती. तो अनेक वर्षांपासून लग्नाचं स्वप्न बघत होता. काही दिवसांपूर्वी तो सोशल मीडियात व्हायरल झाला आणि त्याच्यासाठी अनेक मुलींचं स्थळ आलं होतं.

हापुडमधील मजीदपुरा येथील सभासद हाजी अय्यूब यांनी अजीमचा व्हिडीओ पाहिला. हाजी अयूबब आणि अजीमचे नातेवाईक शाहिद मंसूरी एकत्र बिझनेस करतात. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, त्यांच्या भागात राहणारी बुशराही अजीमच्या उंचीची आहे. त्यांची बोलणी सुरू झाली.

अजीमच्या वडिलांसोबत बोलणी करण्यासाठी अजीमला बघण्यासाठी बुशराच्या घरातील लोक शामलीला आले होते. त्यांना अजीम मंसूरी आवडला. त्यानंतर अजीमच्या घरचे लोक बुशराला बघण्यासाठी गेले होते. तिथे दोन्ही परिवारात सोयरीक ठरली. साखरपुडाही झाला. आता बुशरा बी.कॉसचं शिक्षण पूर्ण केल्यावर लग्न करेल. 

बुशराची मोठी बहीण जोया म्हणाली की, अजीम आणि बुशराचं लग्न ठरल्याने ते सगळे फार आनंदी आहेत. बुशरा फार नशीबवान आहे की, तिला अजीमसारखा जोडीदार मिळाला. बुशराही आनंदी आहे. माझ्यासाठीही मुलगा शोधला जात आहे. दोघींचं एकत्रच लग्न केलं जाईल. 

टॅग्स :GujaratगुजरातJara hatkeजरा हटके