शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

महाराष्ट्रातून लाकूड, गुजरातमधून सिंहासन; राम मंदिरासाठी कोणत्या राज्यातून काय आलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 14:40 IST

अयोध्यातील राम मंदिरासाठी वेगवेगळ्या राज्यांमधून वेगवेगळं योगदान दिलं गेलं आहे. 

अयोध्याच्या राम मंदिरात आज रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. याचा देशभरात जल्लोष केला जात आहे. राम मंदिराबाबत केवळ देशातच नाहीतर परदेशातही फार उत्साह सुरू आहे. रामभक्तांचं मत आहे की, 500 वर्षांचा वनवास संपला आहे. अयोध्यातील राम मंदिरासाठी वेगवेगळ्या राज्यांमधून वेगवेगळं योगदान दिलं जात आहे. 

राज्यांनी ज्या पद्धतीने योगदान दिलं त्याचा लेखाजोखा समोर आला आहे. राम मंदिर निर्माणासाठी राजस्थानच्या नागौरमधील मकरानाचा वापर झाला. मकरानाच्या मार्बलमधूनच राम मंदिराच्या गर्भगृहातील सिंहासन बनवण्यात आलं आहे. भगवान श्रीरामांच्या सिंहासनावर सोन्याचा थर लावण्यात आला आहे. गर्भगृह आणि फरशीवर मकरानातील पांढरं मार्बल आहे. मंदिराच्या पिलरला बनवण्यात मकरानातील मार्बलचा वापर झाला आहे.

मंदिरातील देवतांची कलाकृती कर्नाटकातील चर्मोथी दगडांवर करण्यात आली आहे. त्याशिवाय प्रवेश द्वारावरील भव्य कलाकृतींसाठी राजस्थानच्या बंही पहाडपूरच्या गुलाबी बलुआ दगडांचा वापर करण्यात आला आहे. गुजरातकडून 2100 किलोची अष्टधातुंची घंटा देण्यात आली आहे.

गुजरातच्या अखिल भारतीय दरबार समाजाद्वारे 700 किलोचा रथ भेट देण्यात आला आहे. भगवान रामाची मूर्ती बनवण्यासाठी काळा दगड कर्नाटकातून आला आहे. अरूणाचल प्रदेश आणि त्रिपुरातील नक्षीदार लाकडाचे दरवाजे आणि हातांनी तयार केलेले कापड आले आहेत.

तसेच पितळ्याची भांडी उत्तर प्रदेशातून आली आणि पॉलिश केलेलं सागवान लाकूड महाराष्ट्रातून आलं आहे. मंदिराच्या बांधकामासाठी वीट साधारण 5 लाख गावाहून आल्या आहेत. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश