अजब प्रेमकी गजब कहानी! सूनेने सासऱ्यासोबत केले लग्न
By Admin | Updated: April 26, 2017 23:05 IST2017-04-26T23:04:57+5:302017-04-26T23:05:20+5:30
बदलत्या काळासोबत नातेसंबंधांच्या मर्यादा तोडणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. अनेकदा प्रेमप्रकरणांमध्ये नात्यांच्या मर्यादा तोडल्या गेल्याचेही

अजब प्रेमकी गजब कहानी! सूनेने सासऱ्यासोबत केले लग्न
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 26 - बदलत्या काळासोबत नातेसंबंधांच्या मर्यादा तोडणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. अनेकदा प्रेमप्रकरणांमध्ये नात्यांच्या मर्यादा तोडल्या गेल्याचेही दिसते. असेच एक धक्कादायक प्रेमप्रकरण बिहारमध्ये उघडकीस आले आहे. सासऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुण आणि सुंदर सुनेने पळून जाऊन सासऱ्यासोबत विवाह केला. दरम्यान, आपल्या पत्नीच्या कृत्यामुळे संतप्त झालेल्या पतीने आपल्या वडलांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.
या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी सासऱ्यास अटक केली. मात्र त्याच्याशी विवाह करणारी सून या अटकेनंतर पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडून बसली. तसेच या दोघांनीही पोलीस ठाण्यातस एकमेकांसोबत जगण्या मरण्याची शपथ घेतली. या दोघांच्या प्रेमप्रकरणाला काही वर्षांपूर्वी सुरुवात झाली. त्यानंतर या दोघांनीही मंदिरात जाऊन विवाह केल्याचे उघड झाले. मात्र आपल्या पत्नीच्या कृत्यामुळे या महिलेच्या पतीला जबर घक्का बसला आहे.