शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

जगातल्या सर्वात सुंदर डोळ्यांना पुरस्कार! सहज काढलेल्या फोटोनं केले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 08:59 IST

ओमानमधील एका छोट्याशा निरागस मुलीचे हे फोटो आहेत. सहजच म्हणून काढलेल्या या फोटोला आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिलं पारितोषिक मिळालं आणि फोटोग्राफर मालामाल झाला.

डोळ्यांत मूर्तिमंत भीती... अश्रूंनी डोळे डबडबलेले... हात जोडलेले... २००२ मध्ये  झालेल्या गुजरात दंगलीचा ‘चेहरा’ बनलेल्या कुतुबुद्दीन अन्सारी यांचा हा फोटो संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाला. या दंगलीची भयानकता किती होती, हे सारं काही एका फोटोतूनच लक्षात येत होतं... त्यापुढे एक शब्दही बोलण्याची, सांगण्याची, लिहिण्याची गरज नाही, इतका बोलका हा फोटो...दुसरा फोटो आपल्या हिरव्या डोळ्यांमुळे जगप्रसिद्ध झालेल्या शरबत गुल या बारा वर्षीय अफगाणी मुलीचा. १९८५ मध्ये नॅशनल जिओग्राफिकनं मुखपृष्ठावर हा फोटो प्रसिद्ध केला होता आणि रातोरात शबनम गुल जगभरातील लोकांच्या चर्चेचा विषय झाली. तालिबानी अतिरेक्यांपासून वाचण्यासाठी ती अफगाणिस्तानातून पळाली आणि पाकिस्तानच्या एका शरणार्थी शिबिरात तिनं आश्रय घेतला. पाकिस्ताननंही तिला पुन्हा हाकलून अफगाणिस्तानात पाठवलं. त्यानंतर ही शरबती आँखे अनेक वर्षे जगापासूनच गुल झाली. हे डोळे पुन्हा दिसले ते तब्बल ३० वर्षांनी.

पत्रकारांनी तिला पुन्हा शोधून काढलं आणि तिचा पूर्वीचा व आताचा असे दोन्ही फोटो समोरासमोर ठेवून या डोळ्यांची जादू परत एकदा जगासमोर ठेवली. असे हे डोळे... विसरता येतील कधी?...आता आणखी एका छोट्या मुलीचा फोटो जगाच्या समोर आला आहे. हे डोळेही आहेत हिरवेच, पण हिऱ्यांची चमक या डोळ्यांना आहे... ओमानमधील एका छोट्याशा निरागस मुलीचे हे फोटो आहेत. सहजच म्हणून काढलेल्या या फोटोला आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिलं पारितोषिक मिळालं आणि फोटोग्राफर मालामाल झाला. तो फोटो आहेही तसाच अफलातून...

जगभरातील सर्वोत्कृष्ट फोटोसाठी दरवर्षी ‘हमदान इंटरनॅशनल फोटोग्राफी ॲवॉर्ड’ (एचआयपीए) ही स्पर्धा घेतली जाते. नामांकित फोटोग्राफर्स या स्पर्धेत भाग घेतात. २०११ पासून दुबईचे युवराज शेख हमदान बिन रशीद मोहम्मद अल मक्तुम यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेतली जाते. दरवर्षी स्पर्धेचं  सूत्र वेगवेगळं असतं. त्यात जगभरातील दिग्गज फोटोग्राफर्स आपलं नशीब अजमावतात. यंदा ओमान येथील फोटोग्राफर तुर्की बिन इब्राहिम अल जुनैबी यानं हा पुरस्कार पटकावला आहे. जुनैबी एकदा सहज म्हणून फिरत असताना त्याला ही चिमुरडी दिसली. तिचेही डोळे शरबत गुलसारखेच हिरवे होते, पण या लहानग्या मुलीच्या डोळ्यांत एक वेगळ्याच प्रकारचं तेज होतं.

उत्सुकता म्हणून या मुलीचे फोटो त्यानं क्लिक केले. योगायोगानं यंदा या स्पर्धेचा विषय ‘डोळे’ (आइज) असाच होता. जुनैबीनं सहज म्हणून काढलेला हा फोटो स्पर्धेसाठी पाठवला. त्यात तो अव्वल ठरला. जगभरात हा फोटो आता व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर जुनैबी यांना एक लाख ५४ हजार रियाल (चार लाख डॉलर्स किंवा सुमारे तीन कोटी रुपये) इतकी रक्कमही पुरस्कार म्हणून मिळाली आहे.जुनैबी यानं ओमानमधील मेसिराह या बेटावर हा फोटो क्लिक केला आहे. यासंदर्भात जुनैबी सांगतो, अगदी काही क्षणांसाठी ही मुलगी मला दिसली. योगायोगानं माझा कॅमेरा माझ्याजवळ होता. निसर्गातलं असो वा एखाद्या व्यक्तीमधलं, काही वेगळेपण मला दिसलं, की आपोआपच माझा हात माझ्या कॅमेऱ्याकडे जातो. त्या दिवशीही तसंच झालं. या मुलीला पाहताच तिच्या डोळ्यांतील तेजानं मी भारावलो आणि त्याच अवस्थेत मी तिचे काही फोटो काढले. या मुलीचा फोटो इतका व्हायरल होईल आणि मुख्य म्हणजे त्याला जगातला पहिला पुरस्कार मिळेल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्या आयुष्यातला हा सर्वात अभिमानाचा क्षण आहे. ही मुलगी जितकी सुंदर आहे, तितकाच ओमान हा देश. यानिमित्तानं ओमानचं निसर्गसौंदर्यही जगापुढे यावं, अशी माझी इच्छा आहे. जगातील पर्यटकांचा ओढा आता ओमानकडे वाढेल, अशी मला आशा आहे!”

जुनैबी ओमानचा असला, तरी भारताविषयीही त्याला प्रचंड आकर्षण आहे. भारताच्या विविधतेचा, इथल्या निसर्गसौंदर्याचा आणि इथल्या लोकांचाही तो खूप मोठा चाहता आहे. इतक्या जातीधर्माचे आणि पावलागणिक भाषिक बदल असलेले कोट्यवधी लोक एकत्र कसे काय राहतात, याचं त्याला कायम आकर्षण वाटत राहिलं आहे. याच आकर्षणापोटी भारतालाही त्यानं भेट दिली आहे. आपल्या भारत दौऱ्यात विविध फोटो त्यानं काढले आहेत. विशेषत: वाराणसी (बनारस) येथील वैविध्याचे अनेक फोटो त्यानं टिपले आहेत आणि आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही ते शेअर केले आहेत. त्यांनाही रसिकांची तितकीच दाद मिळते आहे.

जगातील सर्वाधिक रकमेचा पुरस्कार !जगभरात फोटोग्राफीच्या ज्या स्पर्धा घेतल्या जातात, त्यात अंतरराष्ट्रीय स्तरावर ‘हमदान इंटरनॅशनल फोटोग्राफी ॲवॉर्ड’ (एचआयपीए) ही स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. जगातील सर्वाधिक रकमेचा पुरस्कार दिला जाणारी ही स्पर्धा त्यामुळेच नावाजलेली आहे. जगभरातून ज्या हजारो स्पर्धकांनी आपले फोटो पाठवले होते, त्यातून केवळ ३६ फोटो निवडले गेले आणि केवळ पाच उत्तम फोटोंना बक्षीस देण्यात आलं. त्यात जुनैबीच्या ‘गर्ल विथ ग्रीन आइज’ला सर्वोत्तम पुरस्कार दिला गेला. ‘आँखे तेरी शबनमी, चेहरा तेरा आईना..’ हेच खरं.