शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

जन्मापासून नाही हात तरी आहे स्वत:च्या 'पायां'वर भक्कम उभी, मुलीचा करते उत्तम सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 15:12 IST

आज ती केवळ तिच्या पायावर उभी नाही, तर तिच्या ३ वर्षांच्या मुलीची आणि घरातली सर्व कामं ती तिच्या पायाच्या मदतीनं करते. सराहचा हात नसतानाही संघर्ष आणि जिद्द पाहिली की तुमचाही जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.

धडधाकट असूनही आपल्या समस्येंसाठी रडत बसणारे अनेक जण तुम्ही पाहिले असतील. पण सराह ताल्बीची (Sarah Talbi) कहाणी अशा लोकांसाठी प्रेरणेपेक्षा (Inspirational Story) कमी नाही, जे आपले दोन्ही हात आणि पाय धडधाकट असतानाही अडचणींचा दुसऱ्यांपुढे पाठ वाचत रडत राहतात. सराहला जन्मपासून दोन्ही हात नव्हते. परंतु आज ती केवळ तिच्या पायावर उभी नाही, तर तिच्या ३ वर्षांच्या मुलीची आणि घरातली सर्व कामं ती तिच्या पायाच्या मदतीनं करते. सराहचा हात नसतानाही संघर्ष आणि जिद्द पाहिली की तुमचाही जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.

सराह ताल्बी मूळची बेल्जियमची आहे आणि ती जन्मापासून अपंग आहे. परंतु हात नसल्यामुळे ती रडत बसली नाही, तर तिने हातांनी करायची कामंही पायाने करायचं कौशल्य विकसित केलं. आज ज्या वेगाने ती पायाने स्वयंपाक (cooking) करते ते बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. केवळ स्वयंपाकच नाही, तर आपल्या मुलीला तयार करण्यापासून ते घरातली इतर सर्व कामं ती पायांच्या मदतीने करते.

सराह ताल्बी एक कलाकार (artist) आहे आणि तिला ३ वर्षांची मुलगी आहे. लिलिया असं तिच्या मुलीचं नाव असून तिला अंथरुणातून उठवण्यापासून ते शाळेसाठी तयार करण्याचं काम सराह स्वतः करते. हात नसल्याने ती दुसऱ्यांवर अवलंबून नाही, तर ती सर्व कामं पायाने करायला शिकली आहे. घरातली सर्व कामं ती पायाच्या मदतीने अगदी कुशलतेने हाताळते.

मुलीच्या जन्माच्या वेळी, सारा तिला उचलताना थोडी घाबरायची, पण नंतर तिला याची सवय झाली. आता तर ती भाजी चिरणं आणि जेवण तयार करणं ही कामं खुर्चीवर बसून अगदी चोखपणे करते शिवाय मुलीलाही सांभाळते.

सराहचं एक युट्यूब चॅनल (YouTube Channel) आहे. या यूट्यूब चॅनलवर ती तिच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित व्हिडिओ पोस्ट करते. सराहचे तब्बल 2 लाख 74 हजार फॉलोअर्स आहेत. सराह तिच्या फॉलोअर्सना प्रोत्साहन देण्यासाठी व्हिडीओ बनवते. सराह म्हणते की तिला आश्चर्य वाटतं की बऱ्याच लोकांना तिच्या कमतरतांबद्दल जाणून घ्यायचं आहे. तिची मुलगी लिलियालाही तिची परिस्थिती समजून घेते. सराहला तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींमध्ये पतीची साथ मिळते, तो तिला खूप मदत करतो असं ती सांगते. तसंच सुरुवातीला ती मुलीला आवरताना नवऱ्याची मदत घ्यायची, पण नंतर हळूहळू सगळी कामं ती स्वतः करू लागली, असं सराह सांगते.

सराह ताल्बीची ही कहाणी खरंच प्रेरणादायी आहे. जन्मापासून दोन्ही हात नसूनही तिने कुणावरही अवलंबून न राहता आणि निराश न होता सर्व कामे शिकून घेतली आणि आता पायाच्या मदतीने ती सर्व कामं करते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके