ए.आर. रेहमानची बहिण देखिल करणार संगीत दिग्दर्शन

By Admin | Updated: July 11, 2014 18:04 IST2014-07-11T18:03:45+5:302014-07-11T18:04:51+5:30

जगद्विख्यात संगीत दिग्दर्शक ए.आर. रेहमान याची बहिण ए.आर. रेहाना सुद्धा संगीत दिग्दर्शन करणार आहे. ए.आर. रेहाना मद्रास सांस्कृतिक सप्ताहासाठी गाण्याचं दिग्दर्शन करत आहे

A.R. Rehman's sister will see music directing | ए.आर. रेहमानची बहिण देखिल करणार संगीत दिग्दर्शन

ए.आर. रेहमानची बहिण देखिल करणार संगीत दिग्दर्शन

ऑनलाइन टीम
चेन्नई, दि. ११ - जगद्विख्यात संगीत दिग्दर्शक ए.आर. रेहमान याची बहिण ए.आर. रेहाना सुद्धा संगीत दिग्दर्शन करणार आहे. ए.आर. रेहाना मद्रास सांस्कृतिक सप्ताहासाठी गाण्याचं दिग्दर्शन करत आहे. पुढील महिन्यात हा सप्ताह साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी रेहाना 'इथु नमाः चेन्नई' हे गाणं संगितबद्ध करणार आहे. हे गाणं मद्रास सांस्कृतिक सप्ताहासाचे मुख्य आकर्षण असणार आहे. तसेच रेनॉड्रॉप ही युवक संघटना हा कार्यक्रम आयोजित करत असून रेहाना या कार्यक्रमाची ब्रँड अँबेसेडर असणार आहे.
२२ ऑगस्ट १६३९ रोजी चेन्नई हे शहर वसवण्यात आले होते. त्याची आठवण म्हणून मद्रास सप्ताह साजरा केला जातो. मद्रास सांस्कृतिक सप्ताहामध्ये शॉर्टफिल्म आणि गाण्यांच्या माध्यमांतून सामाजिक संदेश दिला जातो. त्याचप्रमाणे चेन्नईचा इतिहास सांगणारा व चेन्नईबद्दल अस्मिता जागृत करणारा हा कार्यक्रम आहे. गेल्या वर्षी १७ ते २४ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. महिलांनी संगित दिग्दर्शन करणं ही बाब भारतात दुर्मिळ आहे. रेहाना संगीत द्ग्दिर्शन करून एक वेगळा इतिहास घडवत आहे.

Web Title: A.R. Rehman's sister will see music directing