शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दगा देणाऱ्या गर्लफ्रेंडच्या ऑफिसबाहेर लावलं बॅनर आणि त्यावर लिहिलं की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 09:32 IST

एका व्यक्तीने दगा देणाऱ्या गर्लफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी सगळ्या सीमा पार केला.

विवाहित जोडपी किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने एकमेकांना दगा दिल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशात असं काही झाल्यावर काही लोक रडत बसतात तर काही लोक याचा सूड घेतात. तसेच काही लोक दगा देणाऱ्या व्यक्तीबाबत सोशल मीडियावर आग पाखड करतात. पण एका व्यक्तीने दगा देणाऱ्या गर्लफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी सगळ्या सीमा पार केला.

चीनमध्ये पोलिसांनी एका तरूणीच्या कंपनीबाहेर काही बॅनर लावल्याच्या आरोपात दोन लोकांना ताब्यात घेतलं. हे बॅनर तरूणीच्या एक्स-बॉयफ्रेंडने आणि त्याच्या सहकाऱ्याने तिचा अपमान करण्यासाठी लावले होते.

यावर तरूणीवर रिलेशनशिपमध्ये दगा दिल्याचा आरोप लावण्यात आला आणि सांगण्यात आलं की, एकाचवेळी दोन तरूणांसोबत ती अफेअरमध्ये होती. मध्य चीनच्या हुबेई प्रांतातील झेंग नावाच्या आरोपी बॉयफ्रेंडने ब्रेकअपनंतर आपलं नातं वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि जेव्हा काही फायदा झाला नाही तेव्हा त्याने सूड घेण्याचं ठरवलं.

झेंगने एका बॅनर ऑनलाईन मागवलं आणि आपला मित्र यानच्या मदतीने मोठमोठ्या शब्दात त्यावर तरूणीबाबत काही गोष्टी लिहून ते तिच्या ऑफिसबाहेर लावलं. या बॅनरचे फोटो ऑनलाईन व्हायरल झाले. त्यानंतर पोलिसांना याबाबत सांगण्यात आलं.

अधिकाऱ्यांनी लगेच पोहोचून बॅनर काढले आणि झेंग व यान यांना अटक केली. दोघांनाही 10 दिवसांसाठी अटक करण्यात आली. 

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटके