अन् वधूने विग काढून फेकला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 00:54 IST2017-06-01T00:54:45+5:302017-06-01T00:54:45+5:30

विवाह म्हणजे आयुष्यातील आनंदाचा क्षण. जेमी या तरुणीसाठीही तो दिवस तितकाच आनंदाचा होता. तिच्या विवाहासाठी

And the bride threw the wig away! | अन् वधूने विग काढून फेकला!

अन् वधूने विग काढून फेकला!

विवाह म्हणजे आयुष्यातील आनंदाचा क्षण. जेमी या तरुणीसाठीही तो दिवस तितकाच आनंदाचा होता. तिच्या विवाहासाठी नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने एकत्र आली होती. तिच्या चेहऱ्यावरील आनंदही स्पष्ट दिसत होता. वर आणि वधूने एकमेकांना अंगठी देऊन विवाहाचा एक विधी पूर्ण केला. विवाहाच्या आणखी एका विधीनुसार, वधूने आपल्या मैत्रीणींच्या अंगावर पुष्पगुच्छ फेकायचा असतो. या वधूने यावेळी चक्क आपला विग मैत्रिणींच्या दिशेने फेकला आणि उपस्थित सर्व जण अवाक् झाले. कारण, या वधूच्या डोक्यावर पूर्ण टक्क ल होते. तरीही अतिशय खंबीरपणे तिने विग काढून फेकला. समजलेल्या माहितीनुसार ही वधू कॅन्सरपीडित आहे. तिच्यावर सध्या केमिओथेरपीचे उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिची ही अवस्था झाली आहे. अशातच तिचे लग्न ठरले आणि ती विग परिधान करून येथे आली. जेमी या रोगाला अतिशय धाडसाने तोंड देत आहे आणि आपल्या लग्नात विग बाजूला सारून ती हेच दाखवू पाहत आहे की, आपण आयुष्यात कितीही त्रस्त असलो तरी हसत राहा...हसत राहा.

Web Title: And the bride threw the wig away!