ट्विटरवर अमिताभ 'महा'नायक

By Admin | Updated: March 23, 2016 06:36 IST2016-03-23T06:36:47+5:302016-03-23T06:36:47+5:30

मिताभ बच्चन यांनी आपणच बॉलिवुडचे 'शेहनशाह' असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या बीग बी यांचे ट्विटरवरील चाहत्याची संख्या २० मिलीयनच्या घरात गेली आहे

Amitabh 'Maha' Nayak on Twitter | ट्विटरवर अमिताभ 'महा'नायक

ट्विटरवर अमिताभ 'महा'नायक

नामदेव कुंभार

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - महानायक अमिताभ बच्चन यांनी आपणच बॉलिवुडचे 'शेहनशाह' असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या बीग बी यांचे ट्विटरवरील चाहत्याची संख्या २० मिलीयनच्या घरात गेली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वजीर, 'पिकू' या चित्रपटाने त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच २० दशलक्ष म्हणजेच दोन कोटी फॉलोअर्सचा विक्रमी पल्ला अमिताभ यांनी पार केला आहे.
 
 
 
 
 
 
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असलेला अभिनेता होण्याचा मान आता अमिताभ यांना मिळाला आहे. याबद्दची माहीती त्यांनी ट्विट करुन चाहत्यापर्यंत पोहचवली आहे. सध्या २० मिलीयनचा ट्प्पा पार केला आहे. लवकरच ३० मिलीयनचा ही टप्पा पार करु असेही ते म्हणाले आहेत. 
ट्विटर फॉलोअर्सच्या बाबतीत त्यांनी ३ किंग खानला मागे पाडले आहे. अमिताभ यांची जादू वयाच्या ७४ व्या वर्षीही कायम आहे. 

Web Title: Amitabh 'Maha' Nayak on Twitter