आत्तापर्यंत तुम्ही अनेकदा ऑनलाईंन शॉपिंग केलं असेल. कारण सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांना काही वस्तू अथवा स्वतःसाठी काही खरोदी असल्यास वेळ मिळत नाही. पण आज तुम्हाला अश्या घटनांबद्दल सांगणार आहोत. जे ऐकून तुम्हाला जर काही ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल. तर दहा वेळा विचार कराल. कारण अनेकदा तुम्ही ऑर्डर एक गोष्ट करत असत आणि डिलीव्हरी झाल्यानंतर भलतीच गोष्ट हाती येते. त्यामुळे पैशांचं नुकसान होतं.
इंग्लंडमध्ये एका व्यक्तीने अॅमेझॉनवरून काही सामान मागवले. पण ते सामान त्याच्या हाती लागलं,तेव्हा अनपेक्षित प्रकार घडला. ही गोष्ट इंग्लंडमधील अनेकांसोबत घडली. ऑर्डर केलेली वस्तू मिळण्याऐवजी कोणाला बॅटरी, कोणाला वॉशिंग पावडर तर कोणाला टुथब्रश अशा वस्तु डिलीव्हरी झाल्यानंतर मिळाल्या. काहीजणांकडे चक्क कंडोम मिळाले.
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार लूसी हेंडरसन यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाला भेटवस्तू देण्यासाठी 'नाइटेंडो स्विच' नावाचा व्हिडीयो गेम ऑर्डर केला. पण जेव्हा त्यांच्याकडे सामानाची डिलीव्हरी झाली. तेव्हा त्या आश्चर्यचकीत झाल्या,कारण त्यावेळी त्यांना ड्यूरासेल बॅटरीचं एक पाकीट आणि वॉशींग पावडरचा एक डब्बा डिलीव्हर करण्यात आला.
पैलादिन शाज नावाच्या गृहस्थासोबत सुध्दा हाच प्रसंग घडला. त्या व्यक्तीने अॅमेझॉन वरून नाइटेंडो स्विच हा व्हिडीयो गेम ऑर्डर केला. पण ज्यावेळी डिलीव्हरी करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे ओरल बी कंपनीचा टुथब्रश आणि दाढी करायचा रेजर पोहोचवण्यात आला. अशाच प्रकारे विकी कारपेंटर नावाच्या एका महिलेने ख्रिसमसची भेटवस्तू देण्यासाठी काही सामान मागवलं होत. पण त्या महिलेला ऑर्डर केलेल्या वस्तुच्याऐवजी जे मिळालं ते पाहून तिचा फारच अपेक्षाभंग झाला. चक्क बेडशीटची डिलीव्हरी झाली होती.