शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

हेलिपॅड, स्विमिंगपूल असलेली अजब गाडी! एकत्र ७० जणांची बसण्याची व्यवस्था; पाहा किती आहे तासाचं भाडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 15:00 IST

१९८६ मध्ये एका कारनं जगातील सर्वात लांब गाडी असल्याचा विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदवला होता. कार तयार होण्यास लागली १२ वर्षे.

१९८६ मध्ये एका कारनं जगातील सर्वात लांब गाडी असल्याचा विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदवला होता. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की या कारची लांबी ही १०० फूट इतकी होती. दिसण्यात ही कार एका ट्रेनपेक्षाही कमी वाटत नव्हती. या कारचं नाव अमेरिकन ड्रिम (American Dream) असं होतं. तर पाहूया की या कारची खासियत काय आहे.

ही कार आपल्या लांबीशिवाय यात असलेल्या सुविधांसाठीही प्रसिद्ध आहे. या कारमध्ये एक पर्सनल हेलिपॅड, एक मिनी गोल्फ कोर्स, जकुझी, बाथटब, अनेक टीव्ही, फ्रीज, टेलिफोन आणि स्विमिंगपूलही होता. आजकाल अनेक महागड्या लक्झरी कार्सही येतात. परंतु या कारमद्ये एकावेळी ७० जणांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या कारला एकूण २६ व्हिल्स होते आणि दोन्ही बाजूंनी ही कार चालवणं शक्य होतं.

तयार होण्यास १२ वर्षेअमेरिकन ड्रीम ही कार कोणत्याही कार कंपनीनं नाही तर जे ओहरबर्ग यांनी डिझाईन केली होती. ते हॉलिवूडच्या चित्रपटांमधील मोठ्या परिचायाचे असलेले व्हेईकल डिझायनर होते. ओहरबर्ग यांना कार्सची आवड होती आणि त्यांनी स्वत:साठीही अनेक उत्तम डिझाईनच्या कार्स तयार केल्या होत्या. अमेरिकन ड्रीम ही कार १९८० मध्ये डिझाईन करण्यात आली होती. ही कार तयार होऊन रस्त्यावर उतरण्यात तब्बल १२ वर्षांचा कालावधी लागला.

किती आहे तासाचं भाडं?या कारचं बॉनेट हेलिपॅडचं काम करतं. तसंच मोठ्या कारसाठी इंजिनही तितकंच शक्तिसाली हवं. यामुळे यात अनेक V8 इंजिन देण्यात आले आहेत. तसंच या कारची लांबी अधिक असल्यानं ही कार मधूनच वळूही शकते. ही कार चित्रपटांमधील दृष्य चित्रित करण्यासाठी तयार करण्यात आली होती. अनेक श्रीमंत लोक ही कार मौजमजेसाठी भाड्यानंही घेत होते. या कारचं भाडं भारतीय रूपयामध्ये जवळपास १४ हजार रूपये इतकं होतं.

टॅग्स :carकारAmericaअमेरिकाHollywoodहॉलिवूड