शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'एलिअन्स येतात आणि गायींचे अवयव कापून नेतात', एका दाम्पत्याचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 10:18 IST

Aliens : एलिअन त्यांच्या गावात येतात आणि गायींना मारून त्यांचे अवयव कापून नेतात. हैराण करणारी बाब ही एक हे सगळं करताना रक्ताचा एक थेंबही तिथे दिसत नाही.

Aliens  : एलिअन्स या जगात असण्याबाबत अनेक वेगवेगळे दावे केले जातात. कधी म्हटलं जातं की, काही दिवसांमध्येच एलिअन्स आणि मनुष्यांमध्ये युद्ध होईल. एलिअन्स पृथ्वीवर ताबा मिळवतील. तर कधी UFO बघितल्याचाही दावा केला जातो. पण आज आम्ही तुम्हाला एलिअन्सबाबत केलेल्या एका अशा दाव्याबाबत सांगणार आहोत जो वाचून तुम्ही हैराण व्हाल. ऑस्‍ट्रेलियामधील काही डेअरी फार्म मालकांचा दावा आहे की, एलिअन त्यांच्या गावात येतात आणि गायींना मारून त्यांचे अवयव कापून नेतात. हैराण करणारी बाब ही एक हे सगळं करताना रक्ताचा एक थेंबही तिथे दिसत नाही.

क्वींसलॅडच्या ग्राज़ियर्स जूडी आणि मिक कुक गेल्या 18 वर्षापासून डेअरी फार्म चावतात. साधारण 14,600 हेक्टर जमिनीवर ते गायी पाळतात आणि त्यांच्याकड 1100 पेक्षा जास्त गायी आहेत. मिक कुक म्हणाले की, इथे गेल्या अनेक वर्षापासून एलिअन येतात आणि गायींना मारतात. त्यांचे स्तन, गाल आणि जीभ कापून घेऊन जातात. इतकंच नाही तर गायींचे मृतदेह शेतात फेकून पळून जातात. अनेक वर्षापासून हेच चालत येत आहे.

कुक म्हणले की, हे कसं होऊ शकतं की, नाक, स्तन, गाल आणि जीभ कापून नेतात आणि रक्ताचा एक थेंबही पडत नाही. जर एखाद्या जंगली प्राण्याने गायींवर हल्ला केला तर त्यांच्या पंजाच्या खुणा दिसायला पाहिजे. गायी भूकेने मरत नाहीत, कारण खाण्यासाठी भरपूर आहे. आणि मग इतक्या सफाईने गायींची सर्जरी केली जाते की, बघून हैराण व्हायला होतं. या अवयवांचा मनुष्याला काही फायदा नाही. दाम्पत्याचा असाही दावा आहे की, त्यांनी त्यांच्या घराजवळ अजब प्रकाशही पाहिला आहे. 

यूएफओ रिसर्च क्वींसलॅंडचे अध्यक्ष शेरिल गॉट्सचॉल म्हणाले की, कुक दाम्पत्य हे असा दावा करणारं एकटं कुटुंब नाहीये. मेक्सिकोमधील एका गावातील लोकांनी सुद्धा एलिअन्सबाबत असा दावा केला होता. हे गाव अमेरिकेच्या सैन्याच्या छावणीपासून जवळ आहे. इथे राहणाऱ्या लोकांचा दावा आहे की, या बेसवर एलिअन्स येत-जात राहतात. एलिअन्स त्यांच्या गायी उचलून नेतात आणि त्यांचे अवयव कापतात. डोंगराजवळ यूएफओ दिसतात. 

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाJara hatkeजरा हटके