एअरएशियाचे पहिले विमान झेपावले

By Admin | Updated: June 13, 2014 04:45 IST2014-06-13T04:20:51+5:302014-06-13T04:45:09+5:30

एअरएशिया इंडिया या देशातील चौथ्या क्रमांकाच्या कमी दराच्या विमान कंपनीचे पहिले विमान बंगळुरू-गोवा मार्गावर आज रवाना झाले

AirAsia's first aircraft flew | एअरएशियाचे पहिले विमान झेपावले

एअरएशियाचे पहिले विमान झेपावले

बंगळुरू : एअरएशिया इंडिया या देशातील चौथ्या क्रमांकाच्या कमी दराच्या विमान कंपनीचे पहिले विमान बंगळुरू-गोवा मार्गावर आज रवाना झाले असून, कंपनीची विमानसेवा सुरू झाली आहे. मलेशियाच्या एअरएशिया बरहार्ड या कमी दराच्या विमान कंपनीची ही भारतीय शाखा आहे.
बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी ३.४४ वाजता या विमानाने उड्डाण केले. इंडिगो कंपनीचे माजी कॅप्टन वैमानिक मनीष उप्पल व किंगफिशर या बंद पडलेल्या विमानसेवेचे माजी वैमानिक दिगांता हे दोघे या विमानाचे वैमानिक होते.
बंगळुरू-गोवा या प्रवासाचे तिकीट ९९० रु. इतके कमी होते. (वृत्तसंस्था)



 

Web Title: AirAsia's first aircraft flew