बारीकपणामुळे नोकरी गमावल्याने एअर होस्टेसची आत्महत्या
By Admin | Updated: July 24, 2014 15:27 IST2014-07-24T15:21:34+5:302014-07-24T15:27:40+5:30
बारीकपणामुळे एअर होस्टेसची नोकरी गमावलेल्या २४ वर्षीय तरुणीने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना दिल्लीत घडली आहे.

बारीकपणामुळे नोकरी गमावल्याने एअर होस्टेसची आत्महत्या
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २४- बारीकपणामुळे एअर होस्टेसची नोकरी गमावलेल्या २४ वर्षीय तरुणीने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना दिल्लीत घडली आहे. अरुणा सिंग असे या तरुणीचे नाव असून याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
पूर्व दिल्लीत राहणारी अरुणा सिंग ही तरुणी एका खासगी विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. मात्र चार महिन्यांपूर्वी बारीक असल्याने अमृताला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. यानंतर अमृता मानसिकरित्या खचली होती. यासाठी तिच्यावर उपचारही सुरु होते. वजन वाढवण्यासाठी तसेच इंग्रजी सुधारण्यासाठी तिने क्लासही लावले होते. बुधवारी संध्याकाळी अमृताने तिच्या बहिणीशी काही वेळ गप्पा मारल्या. यानंतर अमृता तिच्या रुममध्ये गेली व तिथे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री उशीरा अमृताच्या भावाने रुमचा दरवाजा उघडला व ही घटना समोर आली.