शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! तुम्ही कधी ८ पायांचा पक्षी पाहिलाय का? या पक्ष्याबाबत वाचून व्हाल थक्क.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 10:19 IST

या फोटोत एक पक्षी त्याच्या आठ पायांनी चालतो असं दिसतं. हा पक्षी प्रामुख्याने आफ्रिकेत आढळतो. चला जाणून घेऊ या अनोख्या पक्ष्याबाबत..खरंच त्याना आठ पाय असतात का?

निसर्गाने असे काही जीव तयार केले ज्यांच्याकडे बघून विश्वास बसत नाही. तुम्ही कधी आठ पायांचा पक्षी पाहिलाय का? नसेल पाहिला तर आता बघा. या फोटोत एक पक्षी त्याच्या आठ पायांनी चालतो असं दिसतं. हा पक्षी प्रामुख्याने आफ्रिकेत आढळतो. चला जाणून घेऊ या अनोख्या पक्ष्याबाबत..खरंच त्याना आठ पाय असतात का?

या पक्ष्यांची खासियत म्हणजे अंडी दिल्यानंतर मादा पक्षी दुसरा जोडीदार शोधते. अशात नव्या जकाना पक्ष्याला जुन्या जोडीदारासोबत लढाई करावी लागते. यात जो जिंकतो त्याला मादा पक्ष्याच्या हरममध्ये जाण्याची परवानगी मिळते आणि संबंध ठेवण्याची परवानगी मिळते.

या प्रजातीच्या पक्ष्यांमध्ये मादा पक्षी अंडी देऊन खाण्या-पिण्यासाठी निघून जाते. त्यांच्यात नर आणि मादा यांच्यात कामावरून काही भेद नसतात. दोघे मिळून सगळी कामे करतात. हे आफ्रिकन जकाना पक्षी साधारण ३० सेंटीमीटर लांब असतात तेच मादा पक्षी नराच्या तुलनेत आकाराने मोठा असतो. 

हे पक्षी प्रामुख्याने आफ्रिकेतच आढळतात. त्यांची ओळख त्यांच्या अनोख्या पायांमुळेच होते. त्यांचे पाय बगळ्यांप्रमाणे लांब असतात आणि त्याचे पंजे पसरलेले असतात. हे पक्षी आपल्या पायांसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. 

आफ्रिकन जकानाला दोनच पाय असतात. मग म्हणाल की, फोटोत इतके पाय कसे दिसतात? तर याची कहाणी मजेदार आहे. नर पक्ष्याला आपल्या पिल्लांची काळजी घ्यायची असते. ते पित्याची महत्वाची भूमिका बजावतात.  जेव्हा पिल्लं लहान असतात तेव्हा जकाना पक्षी त्यांना आपल्या पंखात लपेटून जमिनीवरून थोडं वर धरतात. पिल्लांना ते पंखात लपवतात. पण त्यांचे पाय बाहेर राहते. त्यामुळे बघताना असं वाटतं की, त्यांचे इतके पाय आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेscienceविज्ञानSocial Mediaसोशल मीडिया