आदित्य नारायणची एअरपोर्टवर अधिकाऱ्याला दमबाजी, याआधीही अडकला बऱ्याच वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 18:05 IST2017-10-03T17:49:06+5:302017-10-03T18:05:34+5:30
बोर्डींगच्यावेळी अधिकारी आणि आदित्य यांच्यात बाचाबाची झाली. जास्त जास्त सामान घेऊन जाण्यासाठी आदित्य जबरदस्ती करत होता.

आदित्य नारायणची एअरपोर्टवर अधिकाऱ्याला दमबाजी, याआधीही अडकला बऱ्याच वादात
ज्येष्ठ गायक-संगीतकार उदीत नारायण यांच्या मुलाने इंडीगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्याला दमदाटी केल्याची बातमी आहे. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जाण्याच्या वादातून ही बाचाबाची झाली.
बोर्डींगच्यावेळी हा अधिकारी आणि आदित्य यांच्यात बोलणं झालं. १७ किलोपेक्षा जास्त सामान घेऊन जाण्यासाठी आदित्य जबरदस्ती करत होता. मात्र अर्थातच अधिकारी त्याला परवानगी देत नव्हते. त्यामुळे आदित्य संतापला. त्याने सर्वांवर आवाज चढवायला सुरुवात केली. त्याने अधिकाऱ्याला ‘कधी मुंबईत आलास तर बघून घेईन, तुझे कपडे नाही उतरवले तर माझं नाव आदित्य नारायण नाही’ अश्या धमक्या द्यायल्या सुरुवात केली.
पाहा व्हिडीओ -
आदित्य नारायण दसऱ्याच्या दिवशी रायपूरला गेला होता. रात्री तिकडे त्याचा शो झाला. इंडीगो एअरलाईन्सच्या नियमांविरुध्द १७पेक्षा जास्त किलो सामान नेण्याच्या हट्टावर तो अडला होता. शेवटी त्या अधिकाऱ्याची माफी मागितल्यावरच आदित्यला बोर्डींगची परवानगी मिळाली.
आदित्यचा हा अवतार पाहून घटनेच्या प्रत्यक्षदर्शींचा संताप झाला. कोणत्याही सेलिब्रिटी किंवा स्टारकिड्सनी त्यांच्या स्टारडमचा गैरवापर करु नये, असं त्या सर्वांचं म्हणणं होतं. तसंच या घटनेत चुक आदित्यची होती, असंही प्रत्यश्रदर्शींचं म्हणणं आहे.
स्ट्रायकर या चित्रपटात लीड करणारा आदित्य नारायण पुन्हा कुठे फारसा दिसला नाही. सध्या छोट्या पडद्यावरील एका रिअलिटी शोमध्ये तो निवेदन करताना दिसतो.
वादात अडकण्याचीही त्याची पहिली वेळ नाही, तर हाच आदित्य याआधीसुध्दा बऱ्याचदा अनेक कॉन्ट्रोव्हर्सीजमध्ये अडकला आहे. एकदा एका रेस्टॉरंटमध्ये अंगलट करणाऱ्या आदित्यला एका मुलीने कानशिलात लगावल्याची बातमी आली होती. मात्र ती मुलगी कोण हे काही समजु शकले नाही. एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घडलेला हा प्रकार बराच गाजला होता.