अबब... पोटातून काढले तब्बल ४० चाकू

By Admin | Updated: January 13, 2017 00:52 IST2017-01-13T00:52:24+5:302017-01-13T00:52:24+5:30

येथील एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून एका व्यक्तीच्या पोटातून चक्क ४० चाकू काढले आहेत.

Aab ... 40 knives removed from the stomach | अबब... पोटातून काढले तब्बल ४० चाकू

अबब... पोटातून काढले तब्बल ४० चाकू

अमृतसर : येथील एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून एका व्यक्तीच्या पोटातून चक्क ४० चाकू काढले आहेत. डॉ. जतिंदर मल्होत्रा यांनी सांगितले की, हा ४२ वर्षीय माणूस तीन महिन्यांपासून चाकू गिळत होता. पोटात दुखत असल्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये आला असता, त्याच्या पोटात काही वस्तू असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. त्याच्या तपासणीनंतर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. पाच डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली. आता ती व्यक्ती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तो चाकू का गिळत होता, हे मात्र समजू शकले नाही, पण तो मानसिक आजाराने ग्रस्त असावा, असा डॉक्टरांना संशय आहे. आता आपण चाकूला कधीही स्पर्शही करणार नसल्याचे त्याने सांगितले आहे. त्याच्या कुटुंबालाही त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: Aab ... 40 knives removed from the stomach