शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

झाडं लावण्यासाठी खड्डे खोदत असताना सापडला मौल्यवान खजिना, पाहून शेतकरी अवाक्, मग केलं असं काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 12:07 IST

Jara Hatke: झाड लावण्यासाठी खोदकाम करत असताना या शेतकऱ्याला अत्यंत मौल्यवान आणि पुरातन असा खजिना सापडला आहे. मात्र या शेतकऱ्याने हा खजिना सरकारजमा केला आहे.

गाझा - अनेकदा लोकांना अचानकपणे असा काही खजिना मिळतो, ज्याबाबत आपण स्वप्नातही विचार केलेला नसतो. हा खजिना अशा लोकांचं नशिबच बदलून टाकतो. काही लोकांना अचानकपणे खजिना सापडल्याच्या बातम्या येत असतात. असाच काहीसा प्रकार एका शेतकऱ्यासोबत घडला आहे. झाड लावण्यासाठी खोदकाम करत असताना या शेतकऱ्याला अत्यंत मौल्यवान आणि पुरातन असा खजिना सापडला आहे. मात्र या शेतकऱ्याने हा खजिना सरकारजमा केला आहे. त्यामुळे या घटनेची चर्चा होत आहे.

रिपोर्टनुसार ही घटाना गाझामधील आहे. येथे एक पॅलेस्टाइनी शेतकरी काही महिन्यांपूर्वी झाड लावण्यासाठी खोदकाम करत होता. खोदकाम सुरू असताना त्याची कुदळ एका टणक वस्तूवर आदळली. त्याने कुतुहलाने मनलाला बोलावून तिथे दोन तीन महिने सातत्याने खोदकाम केले. तीन महिन्यांनंतर तिथे बीजान्टिक काळातील एक कलाकृती सापडली. ही कलाकृती सुस्थितीत होती. या शोधामुळे पुरातत्व विभागाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पुरातत्त्ववेत्ते रेने एल्टर यांनी सांगितले की, ही कलाकृती ५व्या ते ७व्या शतकादरम्यानची असावी. हे बांधकाम कधी तयार करण्यात आले, यााबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. त्यासाठी त्या ठिकाणी अधिक अचूकपणे खोदकाम करावे लागेल. प्राचीन काळात गाझापट्टी, मिस्त्र आणि लेव्हंट यांच्यात व्यापाराचा महत्त्वपूर्ण मार्ग होता. हा भाग ताम्रयुगापासून इस्लामिक आणि ऑटोमन काळापर्यंतच्या संस्कृतींच्या अवशेषांनी भरलेला आहे.

गाझाच्या ज्या भागत ही कलाकृती सापडली आहे, तिथे नेहमी इस्राइल आणि पॅलेस्टाइनमध्ये संघर्घ होत असतो. अशा परिस्थितीत या खजिन्याचं संरक्षण कसं करावं, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ही जागा इस्राइलच्या सीमेपासून एक किलोमीटर अंतरावर आहे. सध्या हा खजिना पत्र्याने झाकून ठेवण्यात आला आहे. खजिन्याचा शोध घेऊन त्याचं संरक्षण केल्याने सरकारकडून बक्षीस मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेIsraelइस्रायलInternationalआंतरराष्ट्रीयhistoryइतिहास