शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पुण्याच्या लेकीचं ऑनलाइन लग्न; पंडिताला दिलेली दक्षिणा ऐकून सगळेच झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 12:59 IST

मुलांची अडचण पाहता घरच्यांनी सिवनीतील ६७ वर्षीय पंडित राजेंद्र पांडे यांच्याशी बोलून विवाह मुहूर्त काढला

सिवनी - सध्या ऑनलाईनच्या युगात लग्नही होऊ लागली आहेत. त्यात मध्य प्रदेशातील सिवनी इथं बसलेल्या एका पंडिताने अमेरिकेतील युवक-युवतीचे ऑनलाईन लग्न जमवले. २१ मे रोजी हे लग्न अमेरिकेतून वर-वधू आणि इतर पाहुणे मंडळी ऑनलाईन सहभागी झाले. यावेळी पंडिताने लॅपटॉपच्या समोर बसून लग्नविधी पार पाडला. मंत्रोच्चार पूर्ण करत हिंदू पद्धतीने नवरा-बायकोला विवाहाच्या बंधनात अडकवले. 

सिवनी येथील सुनील उपाध्याय यांचा मुलगा देवांश उपाध्याय हा अमेरिकेत नोकरी करतो. परदेशात त्याची ओळख पुण्यात राहणाऱ्या सुप्रियाशी झाली. या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु कामातून वेळ मिळत नसल्याने दोघांना भारतात येऊन लग्न करणे कठीण होते. यावेळी देवांशने सिवनीतील त्याच्या नातेवाईकांशी चर्चा केली. 

मुलांची अडचण पाहता घरच्यांनी सिवनीतील ६७ वर्षीय पंडित राजेंद्र पांडे यांच्याशी बोलून विवाह मुहूर्त काढला. तारीख ठरली, त्यानंतर पंडित पांडे यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून दोघांचे लग्न करण्याचे सांगितले. त्यानंतर उपाध्याय कुटुंब अमेरिकेला पोहचले. त्याठिकाणी लग्नाची सर्व तयारी सुरू झाली. लग्नाच्या दिवशी सिवनीत बसलेले पुजारी राजेंद्र पांडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर २१ मे रोजी पंडित राजेंद्र पांडे यांनी देवांश आणि सुप्रियाचा ऑनलाईन विवाह हिंदू पद्धतीने संपन्न केला. 

पंडिताला दिली ५१०० अमेरिकन डॉलर दक्षिणाहा ऑनलाईन विवाह सोहळा करण्यासाठी पंडित राजेंद्र पांडे यांना उपाध्याय दाम्पत्यांनी ५१०० अमेरिकन डॉलर दक्षिणा म्हणून दिली. भारतीय चलनात ही रक्कम जवळपास ४ लाख २० हजार रुपये होतात. पंडित राजेंद्र पांडे म्हणाले की, अमेरिकेत असलेले वर-वधू यांचा ऑनलाईन विवाह करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. हिंदू प्रथा परंपरेनुसार हे लग्न पार पाडले. नवरदेव देवांश हा मध्य प्रदेशातील सिवनीत तर नवरी मुलगी सुप्रिया महाराष्ट्रातील पुण्यात राहणारी आहे. हे दोघेही नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत राहतात. 

टॅग्स :onlineऑनलाइन