मुंबईकरांसाठी ९वे धरण

By Admin | Updated: August 14, 2014 03:27 IST2014-08-14T03:27:00+5:302014-08-14T03:27:00+5:30

भविष्यातील पाणीसंकटाला तोंड देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ५ वर्षांपासून प्रस्तावित केलेल्या मध्यम श्रेणीतल्या गारगाई धरणास केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने तत्त्वता मंजुरी दिली आहे

9th dam for Mumbaiites | मुंबईकरांसाठी ९वे धरण

मुंबईकरांसाठी ९वे धरण

शहापूर : भविष्यातील पाणीसंकटाला तोंड देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ५ वर्षांपासून प्रस्तावित केलेल्या मध्यम श्रेणीतल्या गारगाई धरणास केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने तत्त्वता मंजुरी दिली आहे. मुंबईसाठी हे ९वे धरण ठरणार आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर डोंगररांगांत उगम पावलेल्या गोदावरीची उपनदी वैतरणाला मोखाडा-शहापूरच्या सीमेवर ओगाडे गावाच्या हद्दीत गारगाई ही आणखी एक उपनदी तयार झाली. ही नदी मोखाडा व वाडा तालुक्यांतून वसई भागात वाहते. २००९ ला मध्य वैतरणाचे बांधकाम आघाडीवर असताना तत्कालीन महापौर शुभा राऊळ यांनी गारगाईचे संकेत दिले होते. मात्र, पर्यावरणवाद्यांच्या विरोधाने या धरण प्रकल्पाची मंजुरी रखडली होती. हा प्रकल्प शहापूरच्या तानसा अभयारण्याच्या वनक्षेत्रात येत असून या वनक्षेत्रातून आधीपासूनच मुंबईला मध्य वैतरणा, वैतरणा, मोडकसागर, तानसा व भातसा ही धरणे पाणीपुरवठा करीत असताना आणखी एका धरणाची निर्मिती महानगरपालिकेने हाती घेतली आहे. (वार्ताहर)

Web Title: 9th dam for Mumbaiites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.