रेल्वे बोगीतील शौचालयात सापडला ९० किलो गांजा

By Admin | Updated: June 24, 2014 09:10 IST2014-06-24T01:02:42+5:302014-06-24T09:10:27+5:30

रेल्वेगाडीतील शौचालयात तस्करीच्या माध्यमातून नेत असलेला ९० किलो गांजा सोमवारी रेल्वे पोलिसांनी जप्त केला. गांजा तस्कर मात्र पोलिसांच्या हाती लागले नाही.

90 kilograms of ganja found in the railway bogs | रेल्वे बोगीतील शौचालयात सापडला ९० किलो गांजा

रेल्वे बोगीतील शौचालयात सापडला ९० किलो गांजा

तस्करीचा प्रयत्न फसला : ओखा-पुरी एक्स्प्रेसची घटना
नागपूर : रेल्वेगाडीतील शौचालयात तस्करीच्या माध्यमातून नेत असलेला ९० किलो गांजा सोमवारी रेल्वे पोलिसांनी जप्त केला. गांजा तस्कर मात्र पोलिसांच्या हाती लागले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे आरपीएफच्या विशेष अन्वेषण शाखेच्या निरीक्षकांच्या बैठकीत महानिरीक्षक ए. के. सिंह यांनी रेल्वेद्वारा तस्करीचे प्रमाण रोखण्यासाठी विशेष देखरेख चमू तैनात करण्याची ताकीद दिली होती. त्या आधारावर रेल्वेच्या विशेष शाखेने आपल्या खबरींना कामावर लावले आहे. यापैकीच एका खबरीने सोमवारी रेल्वे क्रमांक १८४०१ ओखा-पुरी एक्स्प्रेसच्या जनरल बोगीने गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. निरीक्षक सिंह यांनी तातडीने याची माहिती बल्लारशहा आरपीएफला दिली. तेथील आरपीएफ अधिकारी रामबीर सिंह यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर आलेल्या ओखा-पुरी एक्स्प्रेसच्या जनरल बोगीची तपासणी केली. तेव्हा बोगीतील शौचालयामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गांजा असलेला आढळून आला. अशा पाच पिशव्या जप्त करण्यात आल्या. प्रत्येक पिशवीत ४६ पॅकेट होते. दोन किलो वजनाचे एक पॅकेट होते. याबाबत तातडीने वर्धेतील रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले. वर्धा जीआरपीचे निरीक्षक नालट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ लाख ५० हजार रुपये किमतीचा ९० किलो गांजा जप्त करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: 90 kilograms of ganja found in the railway bogs