VIDEO : बाप रे बाप! या ८ वर्षांच्या मुलीचा 'बेस्ट फ्रेन्ड' आहे ११ फूट लांबीचा अजगर...

By अमित इंगोले | Published: October 10, 2020 12:15 PM2020-10-10T12:15:10+5:302020-10-10T12:19:40+5:30

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इनबर असं या मुलीचं नाव असून ती तिच्या पालकांसोबत साऊथ इस्त्राइलमध्ये एका एनीमल सॅंक्युरीमध्ये राहते.

8 year old Israeli girls who takes a 11 foot pet python swimming | VIDEO : बाप रे बाप! या ८ वर्षांच्या मुलीचा 'बेस्ट फ्रेन्ड' आहे ११ फूट लांबीचा अजगर...

VIDEO : बाप रे बाप! या ८ वर्षांच्या मुलीचा 'बेस्ट फ्रेन्ड' आहे ११ फूट लांबीचा अजगर...

Next

लहान मुलांना कुत्रा किंवा मांजरींचा लडा असतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण जर कुणी सांगितलं की, एका ८ वर्षीय मुलीचा 'बेस्ट फ्रेन्ड' अजगर आहे तर खरंच विश्वास बसणार नाही. इस्त्राइलमधील एका मुलीचा स्वीमिंग बडी अजगर आहे. जेव्हा तिच्या घराच्या बॅकयार्डातील स्वीमिंग पूलमध्ये उतरते तेव्हा तिचा पाळीव अजगरही तिच्यासोबत असतो. या अजगराचा आकार पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. सामान्यपणे लहान मुले साध्या पालीला बघूनही घाबरतात, पण ही मुलगी ११ फूट लांब अजगरासोबत खेळते. 

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इनबर असं या मुलीचं नाव असून ती तिच्या पालकांसोबत साऊथ इस्त्राइलमध्ये एका एनीमल सॅंक्युरीमध्ये राहते. ती बालपणापासूनच प्राण्यांसोबत राहते, त्यांच्यासोबतच ती वाढली आहे. बेले(अजगराचं नाव) त्याच पाळीव प्राण्यांपैकी एक आहे. जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा इनबरने बेलेसोबतच सर्वात जास्त वेळ घालवला. दोघांची पक्की मैत्री झाली. ( भारीच! शहामृगानं सायकलस्वारांनाही मागे टाकत जिंकली शर्यत; पाहा व्हायरल व्हिडीओ)

इनबरला सापांसोबत फिरणं आणि खेळणं आवडतं. कधी-कधी ती सापाची कात काढण्यात आणि कोरोना दरम्यान आनंदी राहण्यात त्यांची मदत करते. इनबरची आई Sarit Regev ने सांगितले की, 'इनबर अनेक साप आणि इतरही प्राण्यांमध्ये मोठी झाली आहे. जेव्हा ती लहान होती तेव्हा आंघोळ करताना बेले तिच्यासोबतच राहत होता. आता दोघेही मोठे झाले आहेत. दोघेही सोबत राहतात. हे आमच्यासाठी नॉर्मल आहे.
 

Web Title: 8 year old Israeli girls who takes a 11 foot pet python swimming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.