Viral News: जगभरातून रोज काहीना काही विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. काही घटना तर अशा असतात ज्यांवर सहजपणे विश्वासही बसत नाही. सध्या फ्रान्समधील अशीच एक घटना चर्चेचा विषय ठरत आहे. ही घटना वाचून आपणही विचार कराल की, असं झालं तरी कसं? फ्रान्समध्ये एका तरुणाला तीव्र पोटदुखीची तक्रार झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जे समोर आलं, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्याच्या पोटात असं काही दिसलं की, लगेच पूर्ण हॉस्पिटल रिकामं करण्यात आलं. त्या तरुणाच्या शरीराच्या आत पहिल्या महायुद्धाच्या काळातील एक तोफेचा गोळा अडकलेला असल्याचं आढळलं.
मीडिया रिपोर्टनुसार, २४ वर्षीय तरुणाच्या पोटात अचानक जोरात वेदना होऊ लागल्या होत्या. त्यामुळे शनिवारी रात्री त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तो प्रचंड वेदनेत होता. तपासणीदरम्यान समजलं की, चुकून त्याच्या पार्श्वभागातून साधारण ८ इंच लांबीचा टोकदार तोफेचा गोळा आत गेला होता आणि पोटात अडकला होता.
डॉक्टरांनी तातडीची शस्त्रक्रिया केली. त्यावेळी हा गोळा पहिल्या महायुद्धातील म्हणजे १९१८ सालचा जिवंत बॉम्ब शेल असल्याचं उघड झालं. संभाव्य धोका लक्षात घेता, रुग्णालय तात्काळ रिकामं करण्यात आलं.
रुग्णालय का रिकामं करण्यात आलं?
स्फोटाचा धोका असल्याने डॉक्टरांनी बॉम्बनिरोधक पथक आणि अग्निशमन दलाला बोलवलं होतं. रुग्णालय परिसराभोवती सुरक्षा घेरा उभारण्यात आला. तपासणीनंतर संबंधित गोळा अत्यंत धोकादायक नसल्याचे स्पष्ट झाले.
बॉम्बनिरोधक तज्ज्ञांनी तोफेचा गोळा ताब्यात घेतला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो रुग्णालयातच उपचार घेत आहे. हा गोळा त्याच्या शरीरात नेमका कसा गेला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिकाऱ्यांकडून पुढील चौकशी होण्याची शक्यता असून कायदेशीर कारवाईही होऊ शकते.
Web Summary : A French man with stomach pain had a WWI artillery shell lodged in his rectum. Doctors discovered it during examination, leading to hospital evacuation. Bomb disposal experts secured the shell, and the patient is recovering. How it got there remains unknown.
Web Summary : फ्रांस में पेट दर्द की शिकायत लेकर अस्पताल पहुंचे एक युवक के मलाशय में प्रथम विश्व युद्ध का तोप का गोला मिला। जांच के बाद अस्पताल खाली कराया गया। बम निरोधक दस्ते ने गोले को सुरक्षित किया, मरीज ठीक है। गोला कैसे पहुंचा, अज्ञात।