शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
2
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
3
काळजी घ्या! फोन नंबरद्वारे तुमचे लोकेशन ही वेबसाईट उघड करतेय; वैयक्तिक डेटा होतोय लीक
4
पहिल्याच दिवशी शेअरनं केला पैसा दुप्पट; गुंतवणूकदारांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद; विजय केडियांचीही गुंतवणूक
5
सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे
6
Personal Loan चं प्रीपेमेंट केलं की क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? लोन बंद करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
7
अनेक वर्ष एकत्र, नंतर प्रियकराचं ठरलं लग्न; व्हिडीओ बनवून तृतीयपंथीयानं संपवलं जीवन, म्हणाली...
8
७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच...
9
थरारक लव्हस्टोरी! गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने केस केली; पोलिसांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानी प्रियकर थेट भारतात
10
अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाला ED चा जबर दणका; FD, बँक बॅलन्ससह १,१२० कोटींची संपत्ती जप्त
11
Ayushman Card: वर्षात किती वेळा करू शकता मोफत उपचार? कशी तपासाल तुमची पात्रता
12
विराट कोहलीला तब्बल ७ वर्षानी पुन्हा 'ती' कामगिरी करायची संधी, इतिहासाची पुनरावृत्ती होणार?
13
"जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार?
14
मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट ०.२५% ने घटवला; तुमच्या ५० लाखांच्या गृहकर्जाचा EMI किती कमी होणार?
15
सरकार म्हणते, बघा विकासाची गती, विरोधक म्हणतात, ही तर अधोगती!
16
तुमचा पतीही इतर महिलांचे फोटो लाईक्स करतोय?; तुर्की कोर्टानं सुनावलेला 'हा' निकाल एकदा वाचाच
17
"मग दृष्ट कोणी लावली?", आजारपणातून बरी झाल्यानंतर जान्हवीचा सवाल, नेटकरी म्हणाले - छोटा पुढारी
18
Crime: युट्यूबवर व्हिडिओ पाहून दरोड्याचा कट, ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या, परिसरात खळबळ!
19
नवी मुंबईकरांना नवीन वर्षाचं गिफ्ट! नेरुळ-उरण-बेलापूरसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या
20
२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार, केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:41 IST

'मौनसेल हाऊस' या इस्टेटचे सातवे बॅरोनेट असलेले सर स्लेड हे गेल्या अनेक दशकांपासून वारसदार शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.

संपत्ती, राजेशाही आणि वारसदाराचा हट्ट यावर आधारित एक धक्कादायक बातमी इंग्लंडमधून समोर आली आहे. आपल्या १३०० एकरच्या ऐतिहासिक मालमत्तेचा वारसदार मिळवण्यासाठी ७९ वर्षीय सर बेंजामिन स्लेड या ब्रिटीश बॅरोनेटने चक्क एका तरूण पत्नीचा जाहीर शोध सुरू केला आहे. ही केवळ लग्नाची ऑफर नसून, त्यासाठी त्यांनी वार्षिक £५०,००० (सुमारे ५९.३७ लाख रुपये) इतका आकर्षक पगार आणि राहण्याची सोय देण्याची घोषणा केली आहे.

'मौनसेल हाऊस' या इस्टेटचे सातवे बॅरोनेट असलेले सर स्लेड हे गेल्या अनेक दशकांपासून वारसदार शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. वर्तमानपत्रातील जाहिराती, ऑनलाइन डेटिंग प्रोफाइल आणि टीव्हीवरील मुलाखतींद्वारे त्यांनी अनेक वेळा 'उत्तम प्रजनन क्षमता' असलेली पत्नी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आपली मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत एक पुरुष वारसदार हवा आहे.

विचित्र अटींची यादीएवढे वय झाले तरी काही त्यांच्या अटी कमी होत नाहीएत. पत्नी शोधण्यासाठी सर स्लेड यांनी काही विचित्र अटींची यादीच तयार केली आहे. त्यांच्या मते, भावी पत्नी त्यांच्यापेक्षा साधारणपणे तीन ते चार दशके लहान असावी. महत्त्वाचे म्हणजे, 'स्कॉर्पिओ' राशीच्या, गार्डियन वृत्तपत्र वाचणाऱ्या आणि ज्या देशांच्या राष्ट्रध्वजात हिरवा रंग आहे, अशा महिलांनी अर्ज करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या महिलेकडे हेलिकॉप्टर उडवण्याचा परवाना किंवा कायद्याची पार्श्वभूमी असेल, त्यांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांच्या अटींमध्ये आहे. 

स्लेड यांनी वारसदार मिळवण्याच्या तयारीसाठी ९ महिन्यांचा फ्रोझन स्पर्मचा साठाही तयार ठेवला आहे. विशेष म्हणजे, ही इस्टेट १७७२ सालापासून त्यांच्या कुटुंबाकडे आहे, पण सध्या ते आर्थिक अडचणींचा सामना करत असून, ही ऐतिहासिक मालमत्ता एका आलिशान हॉटेल चेनला विकण्याच्या विचारात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : 79-year-old billionaire seeks wife, heir; offers $72,000 salary.

Web Summary : British Baronet, Sir Benjamin Slade, 79, seeks a young wife to produce an heir for his estate. He offers a £50,000 salary plus accommodation. Conditions include being much younger, not a Scorpio, and preferably having a pilot's license.
टॅग्स :Englandइंग्लंड