मुंबईतील ६२ टक्के पालक मुलांना मारतात
By Admin | Updated: February 8, 2015 17:48 IST2015-02-08T17:48:02+5:302015-02-08T17:48:10+5:30
मुंबईतील ६२ टक्के पालक त्यांच्या मुलांना मारहाण करतात अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

मुंबईतील ६२ टक्के पालक मुलांना मारतात
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - मुंबईतील ६२ टक्के पालक त्यांच्या मुलांना मारहाण करतात अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. मुलांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बहुसंख्य पालक मुलांना मारत असून २ ते ८ वर्ष या वयोगटातील मुलांना पालकांकडून सर्वाधिक मार खावा लागतो असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.
मुंबईतील एका संस्थेने नुकतेच सर्वेक्षण केले असून या सर्वेक्षणात मुंबईतील १७०० पालकांची मतं जाणून घेण्यात आली. यापैकी ६२ टक्के पालकांनी त्यांच्या मुलाला मारल्याचे कबुल केले. मुलांना मारण्यात वडिलांपेक्षा आई आघाडीवर असते असेही सर्वेक्षणात म्हटले आहे. २९ टक्के वडिलांनी मुलांना मारल्याचे मान्य केले. तर ६१ टक्के मातांनी मुलांना मारल्याचे सांगितले. मुलं नियंत्रणात नसल्याने त्यांच्यावर हात उगारावा लागतो असे या पालकांचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे या पालकांनी स्वतःदेखील लहान असताना आईवडिलांकडून मार खाल्ला आहे. 'जर एखाद्याला लहानपणी त्याच्या आईवडिलांनी मारले असेल तर तो व्यक्तीदेखील पालक झाल्यावर त्याच्या मुलावर मुलावर हात उगारतो'' असे निरीक्षणही मानसोपचार नोंदवले आहे. याच संस्थेने दोन वर्षांपूर्वीही यासंदर्भात सर्वेक्षण केले होते. यानुसार २०१२ मध्ये मुलांना मारहाण करणा-या पालकांचे प्रमाण ६९ टक्के ऐवढे होते. २०१२ च्या तुलनेत यंदा मुलांना मारणा-या पालकांची संख्या सात टक्क्यांनी घटली आहे.
सर्वेक्षणानुसार सर्वाधिक २ ते ८ या वयोगटातील मुलं त्यांच्या आईवडिलांकडून मार खातात. तर ८ ते १० वर्ष या वयोगटातील मुलांना पॉकेट मनी बंद करु किंवा बोर्डींग शाळेत पाठवू अशी धमकी जास्त दिली जाते अशी माहिती समोर आली आहे.