शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आजी राहीली गरोदर, दिला स्वत:च्याच नातीला जन्म, सोशल मिडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 16:43 IST

सोशल मीडियावर अशाच एका आईची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral News) होत आहे. तिनं आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी चक्क आपल्याच नातीला जन्म दिला .

स्वामी तीन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं जातं. ते खरंच आहे आईची (Mother)  मायाच अशी असते. आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. सध्या सोशल मीडियावर (social media) अशाच एका आईची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral News) होत आहे. तिनं आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी चक्क आपल्याच नातीला जन्म दिला .

द सननं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना ब्राझीलमधील (Brazil) सेंट कटरीना शहरातील आहे. इथे एका ५३ वर्षाच्या महिलेनं आपल्या नातीला जन्म दिला.  या महिलेचं नाव रोजिकलिया डी अब्रू कार्सेम. त्यांना २९ वर्षाची मुलगी आहे. तिला २०१४ पासून पल्मनरी एम्बॉलिज्म नावाचा आजार आहे. या आजारात रक्ताच्या गाठी शरीरात जमा होतात. अशात डॉक्टर प्रेग्नंसीपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. कारण यामुळे त्या महिलेच्या जीवाला धोका उत्पन्न होतो. त्यामुळे ती कधीही आई होऊ शकत नव्हती. मात्र, याबद्दल रोजिकलिया यांना माहिती झालं तेव्हा त्यांनी स्वत:च्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आणि तिला आई होण्याचं सुख मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतला

आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना रोसिकलिया यांनी सांगितलं, की त्यांचं त्यांच्या मुलीवर खूप प्रेम आहे. त्यामुळे आपल्या मुलीसाठी त्यांनी हे केलं. रोसिकलिया म्हणाल्या की मी भाग्यवान आहे की मी माझ्या मुलीला आणि नातीलाही जन्म देऊ शकले. रोसिकलिया यांच्या मुलीचं नाव इन्ग्रिड आहे आणि तिच्या पतीचं नाव फॅबिआना आहे. दोघंही आपल्या मुलीच्या जन्मानंतर अतिशय आनंदी आहेत. IVF च्या मदतीनं या बाळाचा जन्म झाला आहे. यासाठी तब्बल पाच लाख रुपये खर्च आला. हे पैसे क्राउड फंडिंगद्वारे जमवण्यात आले.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेBrazilब्राझीलSocial Mediaसोशल मीडिया