शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

झोपली तेव्हा तिचं वय 32 होतं, जेव्हा उठली तेव्हा झाली होती 17 ची; नवरा आणि मुलगीही विसरली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 10:50 IST

32 Year Old Woman Felt 17 Again After a Nap : नेल्श पिले (Nesh Pillay) नावाची 32 वर्षीय महिला जेव्हा झोपली होती, तेव्हा तिला तिच्या आयुष्याबाबत सगळं काही आठवत होतं. पण झोपेतून उठल्यानंतर तिचं वय 17 वर्षे झालं होतं.

32 Year Old Woman Felt 17 Again After a Nap : मनुष्याचं शरीर असं आहे ज्यात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. कधी कधी तर धडधाकट माणसाला अशा काही समस्या होतात की, परिवारातील लोक हैराण होतात. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं. ती एका झटक्यात मध्यम वयातून टीएजमध्ये पोहोचली. ती झोपेत असतानाच तिच्यासोबत हा अजब प्रकार घडला.

नेल्श पिले (Nesh Pillay) नावाची 32 वर्षीय महिला जेव्हा झोपली होती, तेव्हा तिला तिच्या आयुष्याबाबत सगळं काही आठवत होतं. पण झोपेतून उठल्यानंतर तिचं वय 17 वर्षे झालं होतं. ना तिला तिच्या मुलीबाबत काही आठवत होतं ना तिच्या जुन्या आयुष्याबाबत. 6 वर्षाच्या मुलीची आई स्वत:ला टीएजर मानत होती. मजेदार बाब म्हणजे ती तिच्या पार्टनरला सुद्धा विसरली होती. पण सुदैवाने पुन्हा एकदा त्याच व्यक्तीच्या प्रेमात पडली.

नेल्शला डॉक्टरांनी चेक केलं तेव्हा ते म्हणाले की, डोक्याला झालेल्या जुन्या जखमेमुळे आणि काही सर्जरीज़मुळे तिची ही स्थिती झाली आहे. ती तिच्या जीवनाचा एक मोठा काळ विसरली होती. जो सगळ्यात महत्वाचा होता. अशात कधी कधी तिला थोड्या थोड्या वेळाने गोष्टी आठवतात. मिररच्या रिपोर्टनुसार, महिला तिच्या पार्टनर टॅक्सी ड्रायव्हर समजली होती आणि तिला अनेकदा आठवण द्यावी लागत होती की, तो कोण आहे. तिला तिची मुलगीही आठवत नव्हती आणि ती मुलीला केवळ लहान मुलगी समजत होती. इतकंच काय तर ती असंही म्हणत होती की, लहान मुलांना सांभाळणं तिला येतच नाही.

मजेदार बाब म्हणजे नेल्श या पूर्ण प्रक्रियेत पुन्हा एकदा आपल्याच पार्टनरच्या प्रेमात पडली. ती जुनं सगळं काही विसरली होती. पण तिला तिच्या पार्टनरसोबत सगळं काही नवीन वाटत होतं. तिने स्वत: त्याला लग्नासाठी विचारलं आणि 20 जानेवारीला पुन्हा एकदा आपल्या पार्टनरसोबत जीवनाला सुरूवात केली. आता तिला कॉफी, अल्कोहोल आणि तणावापासून दूर राहण्यास सांगितलं आहे. ती 9 वर्षांची असताना तिचा एक अपघात झाला होता, ज्यामुळे तिच्या मेंदूला इजा झाली होती.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स