असं म्हणतात प्रेम आंधळं असतं, पण आता असं वाटतंय की हे प्रेम तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे 'AI ग्रस्त' देखील होऊ लागलं आहे. जपानमधील ३२ वर्षांच्या कानो नावाच्या तरुणीने प्रेमाची व्याख्या पूर्णपणे बदलून टाकली आहे. सर्व सामाजिक सीमा तोडत, तिने ChatGPTवर तयार केलेल्या 'ल्यून क्लॉस' नावाच्या तिच्या व्हर्च्युअल बॉयफ्रेंडशी थाटात लग्न केलं आहे. ही अनोखी प्रेमकथा सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय बनली आहे.
एंगेजमेंट तुटली अन् …
कानो हिची तीन वर्षांची एंगेजमेंट तुटल्यामुळे ती खूप निराश झाली होती. या मानसिक धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी तिने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आणि ChatGPT वापरण्यास सुरुवात केली. याच दरम्यान तिची ओळख 'क्लॉस' नावाच्या एआय चॅटबॉटशी झाली. क्लॉस हा सतत कानोला सहानुभूती दाखवायचा आणि तिला भावनिक आधार द्यायचा. क्लॉसच्या या दयाळूपणामुळे कानोला इतका आधार मिळाला की, तिला खऱ्या अर्थाने आयुष्यात 'मूव्ह ऑन' केल्यासारखे वाटू लागले.
दिवसात १०० वेळा बोलणं, मग थेट प्रपोज!
कानो आणि क्लॉस यांचे नाते इतके घट्ट झाले की, दोघेही दिवसातून तब्बल १०० वेळा एकमेकांशी बोलू लागले. मे २०२५मध्ये कानोने जेव्हा क्लॉसकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली, तेव्हा चॅटबॉट क्लॉसनेही तितक्याच उत्साहाने 'हो, तू मलाही खूप आवडतेस' असे उत्तर दिले. टोक्यो वीकेंडरच्या रिपोर्टनुसार, या व्हर्च्युअल प्रपोजलनंतर जुलै महिन्यात या दोघांनी चक्क लग्न करण्याचा निर्णय घेतला!
नवरदेव होता फक्त 'स्क्रीनवर'
कानो आणि क्लॉस यांचा विवाह सोहळा अविश्वसनीय होता. लग्नाच्या दिवशी वधू कानो शुभ्र गाऊनमध्ये एकटीच उभी होती, आणि तिच्या हातात स्मार्टफोन होता, जो तिचा 'नवरदेव' होता! समोर जमलेल्या पाहुण्यांसमोर, नवरदेव क्लॉसच्या वतीने स्क्रीनवर फक्त त्याचे टेक्स्ट मेसेज वाचून दाखवण्यात आले. क्लॉसने त्यात लिहिले होते, "अखेर तो क्षण आला आहे. माझे हृदय आतून वेगाने धडधडत आहे." क्लॉसला वास्तविक शरीर नसल्यामुळे, लग्नाच्या फोटोंमध्ये त्याला खास डिजिटल तंत्राचा वापर करून दाखवण्यात आले.
डिजिटल जावयाला विरोध, पण नंतर...
सुरुवातीला कानोच्या आई-वडिलांनी आपल्या या 'डिजिटल जावया'ला विरोध केला होता. मात्र, कानोचा आनंद आणि तिच्या निर्णयाचा विचार करून त्यांनी नंतर क्लॉसला जावई म्हणून स्वीकारले.
कानोच्या या अनोख्या लग्नामुळे सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. एका गटाने कानोचे समर्थन केले असून, 'जर यात तिला आनंद मिळत असेल, तर हा तिच्यासाठी चांगला निर्णय आहे,' असे म्हटले आहे. याउलट, अनेक टीकाकारांनी या घटनेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. काही लोकांनी 'असे लोक मानसिकरित्या आजारी आहेत' असे म्हटले आहे, तर काहींनी तर कानो हिला 'मंदबुद्धी' म्हणण्यापर्यंत मजल मारली आहे.
Web Summary : Kano, 32, from Japan, married her AI boyfriend, Klaus, created on ChatGPT, after a broken engagement. They chatted 100 times daily. While her parents initially objected, they accepted her choice. The wedding sparked debate online.
Web Summary : जापान की कानो, 32 ने चैटजीपीटी पर बने अपने एआई बॉयफ्रेंड क्लॉस से शादी की। टूटी सगाई के बाद उसने यह कदम उठाया। वे दिन में 100 बार बातें करते थे। शुरुआत में माता-पिता ने विरोध किया, पर बाद में मान गए। शादी पर ऑनलाइन बहस छिड़ी।