शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

बाबो! दोन वर्षांनंतर अमेरिकेत तब्बल २६ लाख लग्न, जाणून घ्या काय आहे नेमकं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 14:59 IST

कुणी आपलं लग्न पुढे ढकललं. कुणी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, तर कुणी झूम-गुगल मीट असं ऑनलाइन पद्धतीने लग्न आटोपलं. २ वर्षे ही अशीच गेली. पण आता मात्र या दोन वर्षांतील लग्नाची कमतरता पुरेपूर भरून निघणार आहे (Wedding record).

गेली दोन वर्षे कोरोना महासाथीचा परिणाम लग्नसोहळ्यांवरही झाला. कोरोना लॉकडाऊनमुळे निर्बंध आले. कुणाचं लग्न ठरवता आलं नाही. कुणाचं लग्न ठरलं, लग्नाची तारीखही ठरली पण निर्बंधांमुळे लग्न करता आलं नाही. कुणी आपलं लग्न पुढे ढकललं. कुणी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, तर कुणी झूम-गुगल मीट असं ऑनलाइन पद्धतीने लग्न आटोपलं. २ वर्षे ही अशीच गेली. पण आता मात्र या दोन वर्षांतील लग्नाची कमतरता पुरेपूर भरून निघणार आहे (Wedding record).

लग्नासाठी आता लोक उतावळे झाले आहेत. दोन वर्षे प्रतीक्षा केली पण आता नाही, असं लग्नाच्या बाबतीच लोकांचं झालं आहे असंच चित्र दिसत आहे. कारण या वर्षात इतकी लगीनघाई झाली आहे की लग्नाचा नवा रेकॉर्डच होणार आहे. एकाच वर्षात तब्बल २६ लाख लग्न होणार आहे. अमेरिकेत या वर्षात लग्नाचा पूरच येणार आहे, असं म्हणायला हरकत नाही (26 Lakh marriage in one year).

अमेरिकेत २०२२ साली लग्नासाठी सर्वाधिक बुकिंग होत आहेत. 38 वर्षांनंतर लग्नाचा हा रेकॉर्ड पुन्हा होणार आहे. अमेरिकेत 1984 साली 26 लाख लग्न झाली होती. त्यावर्षी प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांचं लग्न झालं होतं. त्यांना लग्नबेडीत अडकलेलं पाहून लोकांनीही त्याचवर्षी लग्न करायला प्राधान्य दिलं. शिवाय त्यावर्षी एचआयव्हीची प्रकरणंही वाढली होती त्यामुळे लोक अनेक रिलेशनशिपमध्ये राहण्याऐवजी एकाच लाइफ पार्टनरसोबत राहत होते.  त्यानंतर आता २०२२ साली म्हणजे जवळपास ३८ वर्षांनी पुन्हा असे रेकॉर्डब्रेक लग्न होणार आहेत.

गेल्या दोन वर्षांत लग्नसोहळ्यांचा आकडा कमी झाला होता. त्या दोन वर्षांतील लग्नाची कमतरता या वर्षात भरून निघणार आहे. कोरोना महासाथ बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. लोकांनी कोरोना लस घेतली आहे आणि आता मात्र लोक आपलं लग्न टाळण्याच्या पुढे ढतलण्याच्या विचारात बिलकुल नाही. त्यामुळे लग्नाचे वेन्यू, वेंडर, वेडिंग प्लॅनर सर्वकाही फूल बुक झालं आहे.

अमेरिकेत सामन्यपणे शनिवारी लग्न केलं जातं. पण यावर्षी लोक वर्किंग डे म्हणजे कामाच्या दिवसातही लग्न करायला तयार झाले आहेत.  एका ऑनलाइन वेडिंग प्लॅनर कंपनीने लग्नाच्या तारखांवर सर्व्हेक्षण केलं. त्यानुसार आधीच्या तुलने यावर्षी वर्किंग डेला लग्न 11 टक्क्यांनी वाढली आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके