शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

'बारीक असतीस तर डेटला नेलं असतं' रिजेक्शन ऐकून तरूणीने कमी केलं ४५ किलो वजन, बघा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 13:20 IST

Weight Loss Success Story : तिने हे रिजेक्शन आणि टोमणे इतके मनावर घेतले की, ३ वर्षात तिने ४५ किलो वजन कमी केलं. नंतर आपल्या बॉडीचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Weight Loss Success Story : वाढलेल्या वजनामुळे किंवा लठ्ठपणामुळे अनेकांना टोमणी ऐकावी लागतात. अनेकदा हे लोक गमतीचा विषय ठरतात. यातून तरूणीही सुटलेल्या नाहीत. अनेकदा त्यांना रिलेशनशिपमध्येही वजनामुळे रिजेक्शन मिळतं. असंच काहीसं एका २० वर्षीय तरूणीसोबत झालं. पण तिने हे रिजेक्शन आणि टोमणे इतके मनावर घेतले की, ३ वर्षात तिने ४५ किलो वजन कमी केलं. नंतर आपल्या बॉडीचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

'डेली मेल'च्या वृत्तानुसार, तरूणीचं नाव जॅस्मिन असून ती अमेरिकेच्या शिकागोमध्ये राहते. जॅस्मिन बऱ्याच वर्षांपासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत होती. तिने फास्टिंगपासून ते मोजून कॅलरी खाणं आणि डाएट पिल्स घेण्यापर्यंत सगळं ट्राय केलं. सुरूवातीला लोक लठ्ठ, बेढब, जाडे असं म्हणायचे.

जुन्या दिवसांना आठवत जॅस्मिनने सांगितलं की, तिला तर एकदा एक तरूण म्हणाला होता की, जर तू बारीक असती तर तुला डेट केलं असतं.

३ वर्षाआधी जॅस्मिन बेल जवळपास १२० किलोची होती. त्यानंतर तिचा ट्रान्सफॉर्मेशन प्रवास सुरू झाला. तिने हेल्दी डाएट फॉलो करणं सुरू केलं आणि हळूहळू ती जास्त अॅक्टिव झाली. जॅस्मिने जिद्दीने जवळपास ४० किलो वजन कमी केलं. आता ती कॉलेजची एथलीट आहे.

जॅस्मिनने तिचा बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा डिटेल व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला. जेणेकरून ज्यांना वजन कमी करायचं आहे ते लोक प्रेरणा घेतील.

जॅस्मिनने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात तिचे वजन कमी करण्याच्या आधीचे आणि नंतरचे फोटो आहेत. तिने व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं की, 'मी हा व्हिडीओ बनवताना स्वत:च हैराण आहे. या व्हिडीओला १२ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.  

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल